पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वंदे मातरम् लोकमान्य मेळ्याची पद्यावली. ( पद पहिले चाल-हे प्रभोविभो हो ) श्री गजानना प्रथम असो तुज नमन । कर जोडुनि वंदुनि चरण || धृ || तूं रिद्धि सिद्धिचा दाता । तूं दुःख निवारण कर्ता । भक्तांचे संकट हरता । या करितां रिधोनी शरण ॥ १ ॥ भवासंधु तरोनी नेतां । भक्तांचा उद्धार करतां । खल विध्वंसक तूं असतां । कां धरूं नये तव चरण ॥ २॥ या परकीयांची सत्ता । झुगारूनि देई बा आतां । मंगलमूर्ति त्राता असतां । मग भिण्याचें काय कारण ॥ ३ ॥ ( पढ़ दुसरें चाल- फुले सुवासिकही ) किति सुंदर दिसते मूर्तिही । मंगलमूर्ती मंगल करण्या कधिं न कमी करते ॥ धृ ॥ जे गजाननाला भजती उल्हासातें । तो ठेवी त्याला चिर काल सौख्यातें । या करितां त्यातें भजोहो ॥ १ ॥ जारी सदुद्धि दिली लोकमान्य टिळकात । तशि सर्वांना द्या राष्ट्रकार्य करण्यातें । देइ स्वराज्यातें लौकरीं ॥ २ ॥ प्रार्थना करूं हो ऐशी या गणपतितें । असो कृपा छत्र तब “लोकमान्य मेळ्यातें" । हेंचि मागणे तें मोरया || ३ || ( पढ़ तिसरें चाल-घेऊन ये पंखा ) मोरया शक्ती दे आम्हां । राष्ट्रकार्य आज अशा वेळीं । दुही माजली करण्या || धृ ।। सर्व स्थळीं ॥