एकि करा दुहि मांडा । सुबुद्धि दे आम्हां। राष्ट्र ॥ १ ॥ गोरा तो शहाणा । दुहि माजविणे हा वाणा ॥ म्हणुनि तुम्हीं तरुणानों । जागे व्हा आतां । राष्ट्र ॥२॥ स्वदेश तुमचा तो । हीन स्थितीला बहु जातो ॥ स्वस्थ कसे निजलारे | व्हा पुढती आतां । राष्ट्र. ॥ ३॥ “लोकमान्य मेळा" । करितो तरुणां सब गोळा || “टिळकांची" सरणी ती । शिकवी स्व-जनांना । राष्ट्र. ४॥ ( पढ़ चवथें चाल - सबसे राम ) - उठा उठा हो देश बंधुनों ध्या हाती चरका |॥ व ॥ चरका फिरवा सुतहि काढा गांधीजीनी ऐसा । मंत्र स्वदेशीचा जो दिधला तारिल राष्ट्राला ॥ १ ॥ मोह विदेशी वस्तूंचा हा ब्रह्म समंधहि मोठा । मंत्रवले या मारूनि टाका फिरवुनिया चरका || २ || परदेशीचे गोप दोहिती हिंद धेनुच्या दुग्धा । निर्दय दोहन बघुनी हृदया कां न बसे चरका ॥ ३ ॥ गोप नसति खाटीक शोषिती माय धनुच्या रक्ता । चरक्याचें हें चक्र फिरवुनी रक्षा मातेला ॥ ४ ॥ ब्रह्मज्ञानावीण नसे हो साध्य मोक्ष तो जैसा । विना स्वदेशी स्वराज्य तसे कधिं न मिळे समजा ॥ ५ ॥ गीत मधुर गाउनि चरक्याचें साधा आत्मोन्नतिला । स्वर्ग-
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही