( पढ़ सहावें चाल–होई विजयी तूं रंभे ) महाराष्ट्रा को पिचत दास्यपाशीं । हीच वेळ वाशी । नांव राखण्यासी ॥ धृ ॥ दास्यरोग हा। सर्व नाश करि पहा । नरकवास की महा मानवासी ॥ १ ॥ सोडि याक्षणीं । कलह करित जो हानी। आज राष्ट्रकारणीं । कार्य नाशी ॥ २ ॥ देश कारणों त्यजुनि प्राणही रणीं । परी विजयि होउनी घे यशासी ॥३॥ पूर्व काल तो । आज तुज बजावितो । कीर्ति धवल दाविती । स्वप्रकाशी ॥ ४ ॥ शूर छातिचा । खरा सिंह जातिचा शुद्ध मेंटरुं कैचा । आज होशी ॥ ५ ॥ ऊठ शार्दुला झणीं तोड श्रृंखला । मुक्त आर्य भूमिला । करी खाशी ॥ ६ ॥ ( पढ़ सातवें चाल-माझी सुंदर नवरी छान ) म्हणे मी ‘लोकमान्य' होणार, रे देश कार्य करणार ॥धृ॥ शेजारी बहु अशक्त झाला, पाणि देइना हा त्याला । प्रत्यहिं त्याची अशी चाकरी, कोण कशी करणार ॥ १ ॥ सामाजिक किती प्रसंग येती, स्वयंसेवकां कार्य निघे । अशा समयि हा एकल कोंडा, घरोंच हो बसणार || २ || अज्ञानी त्या जनापुढें हा, गप्पा ठोकी परोपरी ।
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही