पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्याची त्या संधी येतां, मागे हा राहणार ॥ ३ ॥ घर बसल्या हा पत्र काढुनी, लिहीतसे हो हवें तसें । म्हण लेखनामुळे अशाची जागृति ती होणार ॥ ४ ॥ दैनिक साप्ताहीक गांठुनी, नुसती चर्चा वाढवितो । जाणतसे कां नसे अशानें कार्य हानि होणार ॥ ५ ॥ फंड गुंड ते मिळवुनि काढी, किती तरी हे फंड पहा । फंडातुनि मग मदत खऱ्या त्यां, कर्त्यां नच देणार ॥६॥ खेडो पाडी कार्य कराया जाण्याची ही वेळ आली । शहरांतील त्या चैन वाजिची, हाव कशी सुटणार ||७|| “लोकमान्यता" सवंग नसते. दिव्य लागतें करावया ॥ अज्ञानी हा गरिब विचारा, काय करूं शकणार ॥ ८ ॥ ( पढ़ आठवें चाल, गजल ) . पाडुनी पक्षभेद आतां । कशाला आत्मनाश करितां । धृ ॥ पेटला देश हा सारा । संकटा आधि त्या बारा । पुरी कां भांडणें न झाली । गळ्याला तात जरि बसली ॥ १ ॥ पाहुनी पक्षभेद आपुला । शत्रुला चव बहु आला । आत्मबल-रक्षणा-करितां । एकव्हा बंधुनों आतां ॥ २ ॥ लेकरें सर्वही साचीं । असुनि ह्या हिंद मातेची । कशाला पक्षभेद आतां । ध्येय तें एकले असतां ॥ ३ ॥ साधण्या राष्ट्रकार्य विकट । जयाला मार्ग जो निकट ।