पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(६) । वाटतो घेउ द्या त्याला । त्वरित निज ध्येय गांठण्याला ४॥ आपणा कार्य जे करणे। करोनी जगता दाखविणें । दुखवुनी खजनांची हृदयें | यशस्त्री कार्य कां व्हावें ॥ ५ ॥ पक्ष हा राष्ट्रिय 'बलवंत' । स्थापिटा करुनि कष्ट अमित वीरवर 'लोकमान्यांनी' । स्मरा त्या पुरुपाची करणी ॥६॥ सोडुनी स्वार्थावर पाणी । सोमुनी वेळि मानहानी ठेविती ध्येय जे पुढती | पुढारी त्यास जन म्हणती ॥ ७ ॥ ( पढ़ नववें चाल - आनंदाचा ) -- लोकमान्य ते स्वर्गी गेले । कर्मयोग तो शिकवोनि ॥ रहस्य गीता करूनी त्यानीं । प्रसाद गेले देऊनी ॥ धृ ॥ “स्वराज्य माझा जन्म-सिद्ध हा । हक्क" वदतसे जनतेला । ठासुनी सांग सरकाराला । नच डरला तो स्वमनीं ॥ १ ॥ चार वेळ जरि तुरुंग घडला । पाठ न दावी शत्रूला || स्वदेश सेवा आमरण करितां । भूतल सोडी आनंदुनी ॥२॥ लोक जागृती करूनी त्यानीं । स्वराज्य नौका हाकारली। पैल तिराला नेण्यासाठीं । हात लाविला गांधिनीं ॥ ३ ॥ “ गांधी " गेले तुरुंगामाजीं। नौका आडके मधोमधीं ॥ नेता नाही म्हणुनी आजीं । तळीं बुडलिहो जाउनी ॥ ४ ॥ म्हणोनि तुम्हीं सर्वही तिजला । हात द्या रे तरण्याला || फूट न पाडा, ऐक्या जोडा।“शिवसुत" सांगे विनवनी ||१५|| १