(७) ( पढ़ दहावें चाल- हा नारायण आडला ) भाई ध्यानि धरी आतां परकीय देतिल तुज लाथा ॥ धृ ॥ धनिक धनंत्तर परदेशीचे भारत वर्षी आले । येउनि येथे व्याप मांडिला मालक तब ते झाले ॥ १ ॥ स्वराज्य काली पितृपितामह घेउनि मस्तक हस्तीं । होते जोडित जमिन जहागिर जिरत्रुनि रिपुची मस्ती ॥ २॥ “ काळी माता " प्रिय प्राणाहुनि मानुनि तिजला देवी । तिच्या रक्षणीं रक्त सांडिलें विसरशि मर्दा केत्री |॥ ३ ॥ त्या वरािंच्या जमिनि हराया टपले बघ हे सगळे । सरित्त- टाकी डोळे मिटुनी वसती जेवीं वगळे ॥ ४ ॥ उद्योगाची करूं उन्नती वोलुनि गोंडस बोल । निज- सत्तेची तव दास्याची मुळे घालिती खोल ॥ ५ ॥ विप्रा केलें खर्डे घाशा वैझ्या दिवली अडत । मर्द मराठ्या मजुर बनवुनी बस पाहती रडत ॥ ६ ॥ सह्यगिरीची सुपीक शेती बुडबुं पाहतो टाटा । नोकरशाही तत् साहाय्या घेउनि बैसली सोटा ॥ ७ ॥ या सोट्याला त्या टाटाला निर्वल करण्यासाठीं । सत्याग्रह ही अमोघ शक्ती घेउनि आपुल्या गाठीं ॥ ८ ॥ संग्रामा तूं कशिश जरी बा येईल तुजला विजय । असें न करिशी जरि तूं बावा होईल खासाच प्रळय ॥ ९ ॥
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही