पान:लोकमित्र १८९५.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

समोरील भिंतीकडे टक लावून पाहूं लागली. वास्तविक तिची दृष्टि कशावरच नव्हती. फक्त डोळे उचंड होते इतकेंच. दृष्टीचा या वेळीं कांहीं उपयोग होत नव्हता. ती एखाद्या गूढ विचारांत मग्न झाली आहे असें तिचे चेह- यावरून स्पष्ट व्यक्त होत होतें. तर तिला आपण त्या च स्थितींत सोडून देऊन त्या वेळीं दाराबाहेर काय गडव बड चालली आहे तिकडे दृष्टि फेंक.

 दरवाज्याबाहेर एक दोन घोड्यांचा टांगा येऊन थडकला. टांगेवाल्याजवळ बसलेला पट्टेवाला खाली उत रला आणि त्यानें टांग्याचे दार उघडिलें. त्याबरोवर आंतून एक गौरवर्ण, वयाने अदमास तिशीच्या जवळजवळचे, भपकेदार पोशाख केलेले असे गृहस्थ खाली उतरले. त्यां- चे पोषाखावरून ते कोणीतरी मोठ्या दर्जाचे गृहस्थ अ- सावेत असा तर्क होई. ते गृहस्थ खाली उतरले व आपली हातांत धरावयाची काठी घेऊन तडक दरवाज्यापाशीं आले आणि तो उघडा पाहून एखाद्या ओळखीच्या मनु- प्याप्रमाणें नीट घरांत शिरले. त्यांनी इकडे तिकडे पाहिले परंतु कोणीच दृष्टीस पडेना. तेव्हां घरांत कोणी नसतांना दरवाजा उघडा आहे हें काय गूढ आहे असें वाटून ते जरा साशंक झाले आणि तसेच पुढे चालले. जातां जातां त्याचे कानीं मृदुध्वनि पडला. त्याबरोबर ज्या खोलींतून तो ध्वनि येत होता, त्या खोलीकडे त्यांनीं आपला मोर्चा फिरविला. इच्छित स्थळीं ते येऊन पोंचले. परंतु आपले जाण्याने या आत्मगत भाषण करणाराचा हिरमोड होईल या हेतूनें ते तेथेंच खोलीच्या दाराशीं तें स्वगत भाषण