पान:लोकमित्र १८९५.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

ऐकत उभे राहिले. त्या वेळी त्यांचे कानावर पुढील शब्द आले.
 " हा तरी वन्संचा दोष नव्हे. त्यांचं अज्ञानच त्यांस असं बोलण्यास लावतं, असंच. लिहिण्यावाचण्यापासून कांहीं अनिष्ट उद्भवेल हीच त्यांची समजूत. आणि ह्मणूनच त्या विद्या ज्या वेळीं बोलण्याची संधि येईल त्या त्या वेळीं तसं ' हिणवून दाखवितात. त्याबद्दल मला राग तर येत नाहींच; पण उलट कींव मात्र येते. आंधळ्याला ज्याप्रमाणें प्रका- शाचा उपयोग आणि त्याचं स्वरूप हें कळत नाहीं, तसंच वन्सं काय आणि इतर बायका काय, सगळ्यांची स्थिति आंधळ्याप्रमाणें आहे. भाऊजींनी जसा आपला मान राखला, तसा त्यांचा शब्द मी खालीं पडूं दिला नाहीं हाही त्यांचा मी मान नाहीं कां राखला ! त्यांचं हृदय कळवळलं आणि ह्मणूनच त्यांनी मला प्रेमानं ती गोष्ट विचारली. हौस ही सगळ्यांना आहेच. प्रत्येक जीवजंतूं- ना हौस असलीच पाहिजे. त्याशिवाय जग चालायचंच नाहीं. मी कबूल करितें कीं, माझी स्थिति सध्या फार कठीण आहे. माझा सर्वस्वी भार भाऊजींवर पडला आहे. मला सध्यां त्यांचाच आधार आहे. ह्या सर्व गोष्टी खऱ्या पण माझा प्राण नव्हे कां ? माझं शरीर भिन्न नाहीं कां ? मग मला हौस कां नसावी ? त्यांतूनही जर मोठीशी बाब असती तर असो. असल्या यत्किंचित् बाबतीत होत असलेला खर्च जर फाजील वाटत असेल, तर वन्संची इतर हौस पुरविण्यांत जो पैसा खर्च होतो, त्याबद्दल नाहीं कां त्यांनी कळवळा बाळगायचा ? बरं, इतकं जर यांना वाटत होतं, तर यांनीं “वैनी, तुला आणखी निरा-