पान:लोकमित्र १८९५.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

ळा कशाला करायला हवा ? मी आपल्यांतलाच थोडा हलवा तुला देईन; ह्मणजे त्यांत दोन्ही होतील. तुझी हौसही फिटेल आणि दादाला व्यर्थ खर्च करण्याचीही जरुरी रहाणार नाहीं" असं ह्मणावयाचं होत! ही मोठी माण- संना? यांनी आमची समजूत घालायची को उलट आ- गीवर तेल ओतायचं? चार सद्गुणांच्या गोष्टी आह्माल सांगण्याचा हक्क यांचा ना ? मग यांनी दुसऱ्यांना तरी का त्रास द्यावा ? नशिवी लिहिल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतात असं जर त्या कबूल करतात, तर मग माणसाला काय ह्मणून दोष द्यावा. खरंच काय चमत्कारिक माझं नशिब आहे ! बानीं सर्व गोष्टी अनुकूल आहेत असं पाहून मला इथं दिली आणि आतां हें काय झालं ? आज जर इथं असणं झालं असतं, तर प्रेमानं तिळगूळ देतां आला नसता काय ? तिकडे मनांत काय आलं असेल आणि हा चमत्कारिक मार्ग कसा बरा वाटला असेल कोण जाणें ! प्रथमपासून सरळ मार्गांतून तिकडचं पाऊल इतकंदेखील ढळलं नाहीं असं जीं माणसं ह्मणत होतीं, तीं आतां काय ह्मणतील हा विचार जातांना मनांत आला नसेल काय ? अथवा सध्यांची गरीबी पाहून तर मनाला वाईट वाटलं नसेल ना ? पण असल्या गरिबी- त राहूनदेखील मी दिवस मोठ्या आनंदानं काढले असते. कसंही असो; सध्या नशिब फिरलं आहे खरं. देवाची मर्जी! माणसांचा त्यापुढे काय इलाज आहे ? देवा अजून तरी तिकडे सद्बुद्धि दे आणि तशीच माझी आठवण तिकडे होईल असं कर? ते इकडे असल्यावर हाचसा काय पण याच्यापेक्षां शेकडोंपट अधिक मला त्रास झाला, तरी