पान:लोकमित्र १८९५.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७ )

मला त्याचं कांहीं वाटणार नाहीं. मला साखरेचाच हलवा काय करायचा आहे? शिक्षण आणि सद्वर्तन या संबंधा- नें जें त्या वैर दाखवितात त्यांना मी या दोन गोष्टींपासू- न काय फायदे आहेत ते सांगेन आणि तोच माझाही तिळगूळ मानून घ्या ह्मणून सांगेन. त्यांनी ऐकलं तर वरं नाही तर काय करायचं आहे ?" इतकें स्वगत भाषण किानी पडल्यावर किंचित् वेळानें एक दुःखाचा सुस्काराही त्यांचे कानी आला. त्याबरोबर आपण इतका वेळ बाहेर उभे राहून तिला व्यर्थ त्रास दिला असे वाटूनच की काय ते एकदम आंत गेले. परंतु, रमा अत्यंत गूढ विचारात नि- मग्न असल्यामुळे तिचे लक्षांत ती गोष्ट आली नाहीं. त्या गृहस्थांनी तिचेजवळ जाऊन तिचे पाठीवर हात ठेवला आणि " खरोखर बहुमोल हलवा तूं आज वांटण्याच योजिलें आहेस " असें ह्मणाले. त्याबरोबर सचिंत बसलेली रमा एकदम शुद्धीवर आली आणि तिनें वर पाहिलें. तिचे नजरेस त्या गृहस्थांचा चेहरा पडल्याबरोबर तिचें सर्व दुःख गळून जाऊन तिला अत्यानंद झाला, तिचें नि- स्तेज झालेले मुखकमल सतेज झालें आणि तिनें एकदम त्या गृहस्थांस मिठी मारली.
 सूज्ञ वाचकहो, हे गृहस्थ कोण हैं आतां तुह्मांक- ळविण्याची जरूर राहिली नाहीं. हेच ते रमाबाईचे पति. त्या विचान्या रमेला आपणाला एकदम सौख्यगिरीवरील अत्युच्च स्थान प्राप्त होईल असें कळलें असतें तर आज तिचे विचार, तिचें सद्वर्तन, नीति, शिक्षण याबद्दलचे विचार आपणास कळले असते काय ?