पान:लोकमित्र १८९५.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )

 असो. संक्रांतीचा दिवस त्या घरच्या माणसांना मोठ्या आनंदाचा गेला. त्यांतून रमेला तर काय प्रत्यक्ष सुखधा- माची प्राप्ति झाली असल्याकारणानें अतिशय आनंदाचा गे- ला. सर्व मंडळी नदीवरून परत आल्यानंतर ज्यानें त्यानें आ- पआपल्यापरी भाऊसाहेबांस त्यांची ते गेल्यापासूनची हकी- कत विचारण्यास सुरुवात केली. यांनीही सर्वांस मोठ्या प्रेमाने आपण इकडून कां निवालों, मुंबईस अभ्यास कसा केल व सांप्रत कोणत्या ठिकाणी मुनसबीच्या जाग्यावर आपण आहोंत हें कळविलें. रमेनेही योजिल्याप्रमाणे सर्वांस स- दुपदेशरूपी तिळगूळ वांटून गोड बोला अशी प्रार्थना के- ली. भाऊसाहेबांस मुनसबी मिळाली ह्मणून अगर रमेच्या सदुपदेशानें मनांत आनंद आणि तिच्याविषयीं पूज्यभाव उत्पन्न होऊन ह्मणा पण आतां ती फुटक्या नशिवाची आणि द्वाड रमा, “रमाबाई " हें पद पावून सर्वांचे मानास प्राप्त झाली.
 वाचकहो, शर्करामिश्रित तिळगूळ आणि या रमेचा तिळगूळ या दोन्हींची तुझीं गोडी पहा, आणि जो उत्तम वाटेल त्याचा स्वीकार करा व गोड बोला.



सरड (आर्या ).

एके दिवशी दोघे मित्र परतले करूनिया सहल |
परिमुनि वृत्त तयांचे मजला अत्यंत वाटले नवल ॥ १ ॥
ते दोघेही होते रंगेल तसेच फार हटवादी ।
वदतां सहज विनोदें, भांडति जैसे जयार्थ ते वादी ॥२॥