पान:लोकमित्र १८९५.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १९ )

मार्गी चालत असतां बोलत गोष्टी अनेक जातीच्या ।
पक्ष्यांच्या प्राण्यांच्या, नानाविध भिन्न भिन्न लोकांच्या ॥ ३ ॥
वदतां गोष्ट निघाली सरडाची, एक त्यांतला बोले ।
"प्राणी फार विलक्षण, ज्याचे शेपूट तया न कीं तोले ॥ ४ ॥
(पालीसम अंग जया, माशापरि वदन, जीभ सर्पाची ।
बांक निळ्या रंगाची अंगावर शोभने जया साची " ||५|
परिमुनि वर्णन ऐसें दुसरा बोले “भले भले भाई |
बाता पुरे करी या चालेना मजपुढे तुझ काई ॥ ६ ॥
हिरवा रंग तयाचा डोळ्यांनी पाहिला स्वतां या मीं ।
वायू भक्षण करितो, असत्य बोलू नये अशा कामी " ॥७॥
बोले पहिला त्यातें "हिरवा कैसा निळा असे साचा ।
प्रत्यक्ष पाहिला मी यास्तव ऐशी वदेन मी वाचा " ॥ ८ ॥
पुनरपि दुसरा बोले “ हिरवा बाबा खरोखरी हिरवा ।
बरवा रंग तयाचा ह्मणास निळा, तो नव्हे, असे हिरवा "।९
रागे "हिरवा !!" बोले पहिला “कां नेत्र नाहिंसे माझे ।
झाले, तुजला वाटे, चोल भल्या माणसास में साजे" ॥१०॥
बोले दुसरा " गेले नेत्र तुझे तर नसे तुझा तोटा, ।
ते जर भलतें दाविति, अमुनी तरि काय फायदा मोठा " । ११ ।
वाढत वाढत गेलें भांडण तें शेवटी विकोपाला ।
बोलत असतां झाले माराया सिद्ध एकमेकाला ॥ १२ ॥
तो तेथे दैवयोगें आला तिसरा मनुष्य, त्यापाशीं ॥
गेले दोघे, ह्मणती "न्याय करा बोलुनी अह्मापाशीं ॥ १३ ॥
रंग निळा की हिरवा सरडाचा ?" तो ह्मणे “ कसे वेडे ।