पान:लोकमित्र १८९५.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )

दोघेही मज दिसतां, कीं जाणुनि जाहलां असे वेडे ॥ १४ ॥
काळा रंग तयाचा, मी तो प्रत्यक्ष पाहिला काल ।
आश्चर्ये कां बघतां पाहुनियां भांडणास टाकाल " ॥ १५॥
एक ह्मणे "दावा तर, आहे प्राणी तुह्माजवळ काय ? |
पाहुनि हिरवा तुमचा दोघांचा भ्रम निवूनियां जाय " ॥१६॥
दुसरा बोले " आहे ठीक, तुली तो निळाच देखाल
तर मग काळा पाहुनि मद्वच सारें खरेंच लेखाल ॥ १७ ॥
ऐसें वदूनि पहिल्या दोघांचा भ्रम करावया दूर ।
तिसरा प्राणी काढी, तो दिसला जैवि लाल शेंदूर ॥ १८ ॥
करिती नवल तिघेही, ह्मणती " हा काय ईश्वरी खेळ ।
हा तर लाल दिसे कीं, यांत मिळावा कसा अतां मेळ" |१९|
( तेव्हां त्या सरडाला वाचा फुटली ) ह्मणे “ तुह्मी खोटे ।
अथवा खरे तिघेही, यांत नसे नवल फारसें मोठें ॥ २० ॥
ईशें मजला दिधली शक्ती ही रंग पालटायाची ।
ही योजना कशास्तव केली त्यालाच ठाउकी साची " | २१ |
तात्पर्य काय याचें, वस्तू बघतात आपणावाणीं ।
अन्यहि अन्य तऱ्हेनें, यास्तव वादी पडूं नये कोणी ॥ २२ ॥



पूर्वीची मल्लविद्या.
( बाळंभटदादांची कुस्ती. )

 पुणे येथें शेवटच्या बाजीरावाचे वेळेस बाळंभटदादा या नांवाचे प्रख्यात ब्राह्मण पैलवान होते. हे बाळंभट-