पान:लोकमित्र १८९५.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )

केवळ त्यांचेबरोबर कुस्ती करून अजिंक्यपत्र मिळवि- ण्याच्या उद्देशाने इतक्या दूरचा प्रवास करून ब्रह्मावर्त येथे आली होती. दादांचा या वेळीं वृद्धापकाळ झाला होता. त्यांचे अंगीं पहिली ताकद राहिली नव्हती. एखा- द्या. तरूण पैलवानाबरोवर कुस्ती करण्याचा त्यांचा आं- वाका नव्हता. आपल्या होतकरू तालिमबाज पट्ट्यांस मलविद्येचें शिक्षण देतांना जी काय कसरत ते करीत, तेवढीच कायती त्यांची रोजची कसरत उरली होती. मात्र त्यांनीं आजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळिले असल्यामुळे त्यांच्या अंगचा तेजस्वीपणा कायम होता. ते वयानें वृद्ध होते, तरी शरिरानें वृद्ध दिसत नसत.
 वर वर्णन केलेल्या लोकोत्तर स्त्रीनें विठूरास येऊन दादांस युद्ध करण्याविषयीं पण घालतांच दादा विचारांत पडले. तरी पण आपले कडकडीत ब्रह्मचर्य आणि आपले वार्धक्य यांकडे पाहून त्यांनीं तिच्याशीं कुस्ती करण्याचें नाकारिलें; परंतु त्यांचे यजमान राववाजी हे पडले पहि- ल्या प्रतीचे दुराग्रही आणि मूर्ख. त्यांनी कांहीं हलकट लोकांच्या सांगण्यावरून " दादांनी त्या स्त्रीबरोबर कुस्ती केलीच पाहिजे" असा आग्रह धरला. बाळंभटदादा हे निस्सीम राजभक्त होते. त्यांनी धन्याचा आग्रह पाहून शेवटीं त्या स्त्रीबरोबर कुस्ती करण्याचे कबूल केलें. दादांना त्यांचे मातेशिवाय किंवा मातेसमान असणाऱ्या दुसऱ्या स्त्रियांशिवाय अन्य स्त्रीचा स्पर्शदेखील ठाऊक नव्हता तेव्हां या आणीबाणीच्या वेळी दादांनी काय केले असेल बरें ? कायतें पुढें लौकरच कळेल. अस्तु. कुस्तीचा दिवस ठरला. जागा तयार झाली. गतवैभव खरं, तरी ते पेशवा-