पान:लोकमित्र १८९५.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

ईतील संस्थान. तेथील व्यवस्था काय विचारावी? त्याचें वर्णन देण्यानें मजकूर वाढेल; तरी पण सर्वतोपरी व्यवस्था उत्तमच होती इतकें सांगितले ह्मणजे बस्स होईल.
 कुस्तीच्या दिवशी दादा आपल्या शिरस्त्याप्रमाणें वेष धारण करून शिष्यशाखेसहवर्तमान रंगस्थलीं येऊन बसले. त्याप्रमाणेंच ती कर्नाटकी स्त्रीही आपल्या प्रिय भावासह मोठ्या थाटानें रंगमंडपांत आली. अद्भुत चम- त्कारच तो! ती मौज पाहाण्याकरितां सारें ब्रह्मावर्त तेथें मिळालें होतें असें ह्मणण्यास हरकत कोणती ? सन्मुख रावबाजींची स्वारी मल्लयुद्धाचा चमत्कार पाहण्यास येऊन बसतांच, तो वृद्ध वीर आणि ती तरुण वीरस्त्री लंगोट- चड्डी चढवून दंड ठोकून हौद्यांत उतरली !
 वाचकहो, या अर्वाचीन काळच्या अद्भुत प्रसंगापेक्षां तो पुराणांतील प्रमिलार्जुन युद्धाचा प्रसंग तुह्मांस अधिक वाटतो काय ? श्रीकृष्णांनी ज्याची अनेक वेळां फटफजि- ती केली तो स्त्रीलुब्ध अर्जुन कोणीकडे, आणि भीष्माप्र- माणें आमरण ब्रह्मचर्यानें राहिलेला बाळंभटदादा कोणीकडे ?
 आमचें लिहिणं कित्येकांना अतिशयोक्तीचें वाटेल, परंतु कुस्तीच्या पेंचांचे खरे मार्मिक जे आहेत, ते पुढील लिहिणें वाचून खरोखर आश्चर्यानें मानाच डोलावतील. आमच्या भीमसेनाप्रमाणें मल्लविद्येत प्राविण्य संपादिलेल्या दादांनी या आणीबाणीच्या प्रसंगीही त्या स्त्रीस स्पर्श न करितां आपलें व्रत कायम राखिलें दंड ठोकून सलामीचा पवित्रा टाकतेवेळीच दादांनी अशा एका विलक्षण पंचाची हूल दाखविली कीं, त्या पेंचावर तोड करण्याकरितां जों ती स्त्री अवसान घेऊन दादांचे अंगावर जाणार तोंच