पान:लोकमित्र १८९५.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )

दादांनी तिला आपले अंग न स्पर्श होई अशा रीतीतें चोरून घेतलें ! व त्यासरशी ती स्त्री दादांच्या अंगाचा यत्किंचितही स्पर्श न होतां चारी मुंड्या चीत पडली. झाले. पुढील वृत्तांत कशाला हवा ? दादांची अनन्य भावानें क्षमा मागून त्यांच्याच आग्रहाच्या सांगण्यावरून त्या स्त्रीनें दुसऱ्या एका योग्य वराशीं आपला शरीरसंबंध करून घेतला व पुढील काल त्याच्या समागमानें सुखांत घालवि ला आणि बाळंभटदादाही सृष्टिनियमाप्रमाणे हा नश्वर भूलोक सोडून गेले ! त्यांच्याबरोबरच आह्मां ब्राह्मण लोकांतील मल्लविद्याही गेली.



कर्मणूक.

 दोघां गृहस्थांचा बेबनाव होता. एके दिवशी ते समो- रासमोरून एका अति अरुंद पुलावरून जात असतां मध्येच दोघांची गांठ पडली. तेव्हां एकजण दुसऱ्याला उद्देशून ह्मणाला " मी मुखीला कधीही वाट देत नसतों. " दुसरा सणाला " परंतु मी देतों" असें ह्मणून तो एका बाजूस झाला.* * *
 उपवर कुमारिका - ( आपल्या इच्छित पुरुषास ) प्रिया, जर आपणास अन्नपाण्याची अडचण पडणार ना- ही असे असेल, तर मी आपल्याशी लग्न करण्यास एका पायावर तयार आहे.
 पुरुष – प्रिये, जर कां तूं फक्त अन्नाची तेवढी सवड लावशील, तर मी जिवापाड श्रम घेऊन पाण्याची तज- वीज करीनच !