पान:लोकमित्र १८९५.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )

रीत असतां विद्यार्थ्यास कशा प्रकाराने आपल्या विद्याभ्या- साचे दिवस काढावे लागत, याची चांगली कल्पना होऊन सांप्रतकाळीं विद्यार्थ्यांचें गुरुजनांशीं जें दुषणीय वर्तन घडत असतें त्यापासूनही ते परावृत्त होतील अशी सबळ आशा आहे.
 पूर्वी या आपल्या भारतवर्षात धौम्य नामेंकरून कोणी एक मोठा तपोधन मुनिवर्य रहात असे. त्यास उपमन्यु, आरु- णि आणि वेद असे तीन शिष्य होते. हे तिघेही शिष्य मोठे कुशाग्र बुद्धीचे असून नेहमीं गुर्वाज्ञा-प्रतिपालन-तत्पर असत- आपल्या ठिकाणी आपले शिष्य कितपत प्रेम ठेवितात आणि आपली आज्ञा पाळण्यास ते कितपत तयार असतात याची परीक्षा पाहण्याकरितां धौम्य ऋषीनें त्यांस एकदां अतीशय कठीण अशीं कष्टाचीं कामें करावयास सांगितले. तेव्हां गुरूच्या आज्ञेप्रमाणें तीं सर्व खडतर कष्टाचीं कामें उत्तम प्रकारें पार पाडून ते तिघेही शिष्य धौम्यगुरूच्या कृपेस पात्र झाले. त्यांतील उपमन्यूच्या वांट्यास आलेल्या कष्टतर व्रताचें वर्णन खाली दिले आहे.
 उपमन्यु हा गुरूच्या आज्ञेनें नित्य प्रातःकाळी आश्रमां- तील गायी वेऊन त्यांस अरण्यांत चारावयास नेई; आणि सायंकाळ होतांच पुनः त्यांस आश्रमांत घेऊन येई. एके दि- वशीं गुरूनें त्यास विचारिलें कीं, "तूं एकसारखा सकाळपासू- न संध्याकाळपर्यंत अरण्यांत असतोस, असे असून तूं इतका शरीराने पुष्ट कसा दिसतोस? व आपली उपजीविका कशी करितोस?" उपमन्यूनें उत्तर केलें, “सायंकाळी आश्रमांत आल्यानंतर आपल्या आश्रमासन्निध असलेल्या इतर ऋषींच्या आश्रमांतून भिक्षा मागून त्या अन्नानें मी आपली