पान:लोकमित्र १८९५.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

क्षुधा शांत करितों. " गुरु ह्मणाला " तूं भिक्षा मागून आणि- लेलें अन्न प्रथम गुरूला समर्पण केल्यावांचून कसें भक्षण करितोस? भिक्षेचें अन्न प्रथम गुरूला समर्पण केल्यावर गुरूनें कृपा करून कांहीं परत दिल्यास तें भक्षण करावें; अर्से असतां हा अविधि करणें तुला योग्य नाहीं. याकरितां. उद्यांपासून तें सर्व अन्न आणून मला अर्पण करीत जा." उप- मन्यून ती गुरूची आज्ञा मान्य करून ह्यटलें "ठीक आहे. "
 कांहीं दिवसांनी पुनः उपमन्यूला चांगला पुष्ट असलेला पाहून गुरु ह्मणाला, " तूं अजूनही पुष्ट कसा दिसतोस? उपमन्यु ह्मणाला, “पुनः दुसरी भिक्षा मागून त्यावर आप- ला निर्वाह करितों. " गुरु ह्मणाला, " अतःपर तूं पुनः भिक्षा मागावयास जात जाऊं नकोस. कारण, तुजपासून त्या अर- यवासी जनांस पीडा होते. " त्यावरून त्यानें पुनः भिक्षा मागण्याचे सोडून दिलें व तो तसाच उपवासी राहूं लागला.. परंतु, क्षुधेची पीडा फार भयंकर आहे. ती मनुष्यास पाहिजे तितक्या कल्पना सुचविते व पाहिजे ते आचर- ण करावयास लाविते. क्षुधेची बाधा जास्त होऊं लाग- तांच उपमन्यूनें चारणीस नेलेल्या गोसमुदायांतून एका गाईचें दूध पिऊन उदरपीडा निवारण्यास सुरुवात केली... या वेळीही शिष्यास ग्लानिरहित असा अवलोकन करून गुरूने त्यास सर्व वर्तमान पुसलें; व त्याचें दुग्धप्रा- शन बंद केलें.
 गुरूनें दुग्धप्राशनाचाही निषेध केल्यावर उपमन्यु गो- वत्सांच्या मुखांस लागलेला दुधाचा फँस भक्षण करून आपला निर्वाह करूं लागला. पुनश्च त्याच्या शरीराचें पुष्टत्व गुरूच्या ध्यानांत येऊन त्यानें त्याबद्दल चौकशी