पान:लोकमित्र १८९५.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )

केली, आणि ह्मणाला "ते सकरुण वत्स आत्मविभागाचा तोटा करून तुला तो फँस देतात, व तेणेंकरून त्यांस फार पीडा होत असेल. याकरितां आजपासून असलें अध- मंचरण तं वर्ज केले पाहिजेस. "
 याप्रमाणे सर्व तऱ्हेचे उपाय हरल्यावर एके दिवशीं क्षुनें अतीशय व्याकुळ होऊन उपमन्यु अरण्यांत गेला, आणि त्याने दुधासारखा पांढरा शुभ्र रुईचा चीक प्राशन केला. त्याबरोबर त्याच्या डोळ्यांस अंधत्व आलें; व तो अरण्यांतून परत आश्रमास येतांना मार्गीत एका भयंकर कूपांत पढला. पुढे सर्व धेनु आश्रमांत येऊन पोहचल्या तरी उपमन्यूचा पत्ता नाहीं; असें पाहून तो वरून खडतर दिसणारा परंतु अंतःकरणाच्या ठिकाण अमोघ शिष्य- प्रीति धारण करणारा मुनि आपल्या प्रिय शिष्याच्या शोधार्थ अरण्यांत गेला आणि शिष्याचें नांव घेऊन मोठ- मोठ्यानें त्यास हाका मारूं लागला. ज्या कूपांत उपमन्यु पडला होता त्या कूपाजवळ जेव्हां धौम्य मुनि आला, तेव्हां त्याची हाक उपमन्यूच्या श्रवणीं पडून त्यानें उत्तर केले "हे गुरो, मी अंब होऊन या कूपांत पडल्यामुळे दुर्निवार दुःख भोगीत आहे. मी पूर्णपणे अंव झालों आहें यामुळे मला वर येतां येत नाहीं. याकरितां मला वर काढून माझे दुःख निवारण करा."
 शिष्याचें तें दुःख पाहून धौम्यमुनि अंतःकरणांतून फारच कळवळला. आणि त्याने त्यास देववैद्य जे अश्वि- नीकुमार त्यांचे आवाहन करावयास सांगितले. तेव्हां उपमन्युनें अश्विनीकुमारांचे स्तवन करितांच ते त्या स्थळी प्रकट झाले व तेही पुनः त्याचे सत्य पाहण्याकरितां