पान:लोकमित्र १८९५.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

त्यास खावयास एक अपूप ( धारगा ) देऊं लागले. त्यावर उपमन्यु त्यांस ह्मणाला, “ गुर्वाज्ञेवांचून हा अपूप मला भक्षण करितां येत नाहीं. याकरितां हा भक्षण न केल्या- बद्दल आपण मला क्षमा करावी. " याप्रमाणें त्याची अत्यंत गुरुनिष्ठा अवलोकन करून ते अश्विनीकुमार त्यावर अतीशय प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास दिव्य दृष्टि देऊन सांगितले की " तुझ्या गुरूचे दंत काळे लोखंडाचे आहेत; परंतु तुझे सोन्याचे होतील. तूं गुरुभक्त- शिष्य अत्यंत धन्य आहेस. तुझा गुरु कांहीं ब्रह्मज्ञ नाहीं परंतु तूं मात्र भक्तिचळाने कृतार्थ होशील."
 याप्रमाणें आशीर्वचन देऊन अश्विनीकुमार स्वर्गलोकों गेल्यावर तो गुरुभक्त उपमन्यु आश्रमांत येऊन गुरुचरणीं लीन झाला. या प्रसंगाचे कविवर्य मोरोपंत यांनी फारच उत्तम वर्णन केलें आहे. तें खाली देऊन हा लेख संपवितों.

आर्या.

उद्धरुनि देव गेले मग तो उपमन्यु गुरुपदीं लागे ॥
पुसतां झालं वृत्त प्रांजलि होऊनि सर्वही सांग ॥ १ ॥
धौम्य ह्मणे तुज यावें शास्त्रांसह उपाठ वेदांनीं ॥
हो धन्य मज वराच्या प्रेमभर किमपि नाठवे दानीं ॥ २ ॥
जे आश्विनेय वदले त्या कल्याणासि पात्र होशील ||
शिष्य-चकोरांसि तुझा अमृतें मुखचंद्र नित्य पोशील ॥ ३॥

 अशा रीतीनें तो गुरुभक्त उपमन्यु आपल्या दृढतर भक्तिभावानें आपला गुरु आणि स्वर्गवासी आश्विनीकुमार यांच्या आशीर्वादास पात्र होऊन सर्वतोपरी कृतार्थ झाला.