पान:लोकमित्र १८९५.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३० )
मोरेश्वराष्टक.
श्लोक ( वसंततिलका. )

श्री पार्वती धव! कुमार गजास्य ताता ! ॥
नाहीं तुझ्याविण जगीं मज अन्य त्राता ॥
अदुशेखर शिवाऽखिल विश्वपाला ||
मोरेश्वरा ! नमित दीन पदांबुजाला ॥ १ ॥
पंचानना विषविभूषित कंधरा ! हे
मच्चित्त है तव सदधिवरीच राहे ॥
येवो न वीट भजनीं कधिं मन्मतीला ॥
मोरेश्वरा ! नमित दीन पदांबुजाला ॥ २ ॥
कंदर्पदर्प हर ! सर्प सुशोभितांगा ॥
वाहे शिरीं सुरनदी तव पाप-भंगा ॥
शोभे गळां ललित ती नरमुंड माळा ॥
मोरेश्वरा नमित दीन पदांबुजाला ॥ ३ ॥
शार्दूल चर्मधर शर्मद अंधकारे ॥
तापत्रया चुकवि दुष्ट विदारकारे ||
दीनोद्धरा बहु अगम्य तुझी सुलीला ॥
मोरेश्वरा नमित दीन पदांबुजाला ॥ ४ ॥
वेदाऽगमाऽविदिततत्व ! जडत्व नाशा ॥
नाशी हरा! त्वरित वैषयिकी दुराशा ||
अज्ञान घालविच (तुं ) जैवि रवी तमाला ||
मोरेश्वरा नमित दीन पदांबुजाला ।। ५ ।।
कर्पूर कुंद धवला ! कमलेशमित्रा ॥
शंभो ! भवा विबुधवंदित भालनेत्रा ॥
भूतेश हे सदय दूर करी भवाला ||
मोरेश्वरा नमित दीन पदांबुजाला ॥ ६ ॥