पान:लोकमित्र १८९५.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१ )

कैलास शैलकृत मंदिर ! पूर्ण कामा ॥
रामाभिधान मधुलोलुप सौख्यधामा ||
मृद्वंक संस्थित शुचिस्मित गोत्रवाला ||
मोरेश्वरा नमित दीन पदांबुजाला ।। ७ ।।
दिक्ल योगिजन मानस राजहंसा ||
आनंदकंद विमला भुजगावतंसा ||
लोकेश रक्षि " ल० ग० गा० " व्हय किंकराला ||
मोरेश्वरा ! नमित दीन पदांबुजाला ॥ ८ ॥



ऐतिहासिक करमणूक.

 कृष्णपक्षांतील रात्र. आप्पाप्रमाणे रणधुरंधर मोह- याचें निराशयुक्त वदन दृग्गोचर न व्हावें एतदर्थच स- कल जीवजंतु व वनस्पति यांस संतोष देणारा जो रजनी- नाथ, त्याचे आगमन झालें नव्हतें, व त्यामुळे पतिविरहानें अत्यंत दुःखित होऊन अमोल्य अशा भूषणांचा त्याग करून रजनीनें कृष्णवस्त्र परिधान केलें होतें. अशा वेळीं आप्पाचे छावणींत जिकडे तिकडे सामसूम दिसत होतें. आप्तइष्टांचा मोह सोडून केवळ आपल्या धन्याकरितां शीर हातावर घेऊन रात्रंदिवस लढणारे शिपाई दमून- भागून गेले असल्यामुळे निद्रासुखाचा अनुभव घेत होते, आणि त्यायोगें लढाई तहकुब ठेविली असल्याचे उघड दिसत होतें. या रणहोमी आहुतींत पडलेल्या स्वामिनिष्ठ शिपायांची निर्जिव शरीरें फाडून तीं छिन्नविछिन्न करून आंतील इष्ट पदार्थांचें यथेच्छ सेवन करून पुष्ट बनलेल्या वनपशूंच्या लांबवर आरोळ्या, तशीच पहाऱ्यावरील शि-