पान:लोकमित्र १८९५.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )

पायांची कर्कश आलबेल आणि शस्त्रघातानें शरीरास झालेल्या असंख्य जखमांनी विव्हळ होऊन पडलेल्या शिपायांचे करुणस्वर हीं मात्र क्वचित प्रसंगी ऐकूं येत हो- ती. एकंदरीत त्या वेळचा देखावा मोठा चमत्कारिक दिसत होता.
 श्रमपरिहार होण्यास विश्रांतीसारखे दुसरें साधन ना- ही. अंगांत पुनः तकवा आणण्यास तिजप्रमाणें दुसरें रामबाण औषध नाहीं; आणि असा कांहीं चमत्कार आ- हे की, श्रम झाल्यावर तिची अवश्यकता वाटू लागते व प्रत्येकजण ती मिळणाऱ्या मार्गाचें अवलंबन करी- त असतो. परंतु, तिचा अनुग्रह ज्या वेळीं मनाचे व्यापार स्थीर रहातील त्या वेळीच होतो. मनाची अस्वस्थता आणि विश्रांति या दोघांचें पुरते हाडवैर. एकमेक एकमेकांचें 'दर्शन घेण्यासही खुषी नसतात. आणि याच सिद्धांतास अनुसरून आप्पा जरी आपल्या तंबूत विश्रांतीस्तव श- य्येवर पडले होते, तरी त्यांस झोंप कशी ती बिलकूल येईना. त्यांचे मनांत विचारांचे काहूर उसळलें होतें. ए- कवार जी गोष्ट त्यांस करावीशी वाटे तीच कांहीं वेळाने करूं नये असे वाटे. आजपर्यंत कोणालाही हार जाऊन आपला पाय मागे घेण्याची वेळ आली नाहीं तो प्रसंग आतां जवळ आला असे वाटून तर त्यांचें मन फारच उद्विग्न झालें होतें. आणि अशा स्थितीतच ते या कुशी- वरून त्या कुशीवर अशी तळमळ करीत होते.
 ही चिमाजी आप्पाची कोकणपट्टीतील मोहीम होय. या मोहिमेंत कोकणपट्टीतील अनेक किल्ले हस्तगत करून घेऊन स्वारींनी वसईचे किल्ल्यास शह दिला. वसईचा