पान:लोकमित्र १८९५.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

किल्ला आधींच बळकट, त्यांतून तो समुद्रांत. एकच अंग खुकीला आणि तशांत त्यावर अंमल फिरंग्यांचा. त्यांज- जवळ कवाईत शिकवून तयार केलेली अनेक पलटणें ज- य्यत तयार होतीं. आणि शिवाय लढण्याचे कामांत त्यांची त्या वेळीं ख्याती होती. या सर्व गोष्टींचा विचार करूनच आप्पांनी पुष्कळ फौज तयार करून स्वारीस आरंभ केला होता. तशीच समुद्रावर लढण्याकरितां आर- मारांचीही त्यांनी व्यवस्था ठेविली होती. दोन्ही पक्षांक- डील तयारी जय्यत मंडळी लढण्यांत कुशल, तेव्हां तीन वर्षे सतत चिमाजी आप्पांनी दोन्हीकडून मारा सुरू करून किल्ला हस्तगत करण्याची खटपट केलेली व्यर्थ गेली यांत कांहीं नवल नाहीं. तीन वर्षे लढाई सुरु, नऊ लाख लोक धारातीर्थी पतन पावलेले, जवळची सामु- श्री बहुतेक संपुष्टांत आलेन्टी आणि शिवाय इतर सरदा- रांची मनें लढाईविषयीं पराङ्मुख झालेलीं अशी स्थिति जेव्हां आप्पांचे अवलोकनांत आली, तेव्हां आजपर्यंत मिळविलेल्या कीतींवर पाणी सोडून शेवटी दीन होऊन परत जाण्याचा प्रसंग येणार असा विचार मनांत येऊन आप्पांचें हृदय द्विधा झालें आणि अशा स्थितीतच ते आपल्या तंबूत पडले होते.
 बराच वेळ अंथरुणावर पड़न झोप येत नाहीं असें पाहून ते शेवटी कंटाळून उठून बसले. तों त्यांचे मनांत अधिकाधिक विचार घोळू लागले. मनांत चाललेल्या विचारांच्या स्वरुपाचें प्रतिबिंब चेहऱ्यावर उत्तम तऱ्हेनें दृष्टीस पडते त्याप्रमाणें आप्पांचे चेहऱ्याकडे जर कोणी त्या वेळी बारकाईने पाहिलें असतें, तर त्यास घटकेंत चिं-