पान:लोकमित्र १८९५.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

घटकेंत भय, आणि नंतर थोडासा आनंद वगैरेची छाया पूर्णपणे दिसून आली असती. असो, अशा रीतीनें कांहीं काळ लोटल्यावर त्यांचे मनांत एक तऱ्हेचा विचार येऊन आणि तो कायमचाच असें बहुत वादविवादावरून ठरल्यासारखा दिसला. कारण, लगेच ते उठले आणि त्यांनी सर्व सरदार मंडळीस आतांचे आतां मजकडे ये- ण्याविषयीं सूचना करून ये ह्मणून आपल्या खिजमतगा- रास फर्माविलें. प्रत्यक्ष आप्पांचा हुकूम मग तेथें कसला विलंब लागणार ! खिजमतगारानें लगेच ती आज्ञा मान्य केली आणि कांहीं वेळाने ज्या ठिकाणी इतका वेळ अंधारगु- डुप होता व जें स्थल शून्यवत् भासत होतें तेंच आतां प्रकाशाने व माणसांनी गजबजून गेलें व थोड्याच अव काशांत सर्व सरदार मंडळी आप्पांचे तंबूंत हजर झाली. बहुतेक मंडळीचे चेहऱ्यावर निराशेचे स्पष्ट चिन्ह दिसत होतें. फक्त आप्पांचा चेहरा मात्र या वेळी जरा खुलून त्यावर निश्चयाची स्पष्ट छाया दिसत होती. सरदार मं- ळी आपआपले जाग्यावर स्थित झाल्यानंतर भाऊंनी लढा संबंधाचा विषय काढला आणि त्यासंबंधानें मंडळी- चीं मतें जागण्याची उत्सुकता दाखविली. परंतु कोणा- च्याच तोंडांतून निश्चयात्मक असें कांहींच येत नाहींसें पाहून स्वतः आप्पांनीच त्यांस आपला ठरलेला निश्चय कळविला. ते मोठ्या आवेशानें ह्मणाले "शूर सरदार हो, वीराचे खरें कर्तव्य ह्मणजे काय याची आपण ओ- ळख विसरांत असें वाटतें ! येथून अपयशाचे खापर माथी वऊन परत जाणें म्हणजे निवळ बायकांप्रमाणें बां- गड्या भरणें होय. तर शूर लोकहो, तुमचेवर निराशेनें