पान:लोकमित्र १८९५.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

इतक्यांत, ठरलेल्या गोष्टीस आपले पूर्ण अनुमोदन असून निराशेचा -हास झाल्याकारणानें आपणास अत्यानंद झाला आहे असे सुचविण्याकरितांच की काय, रजनीनाथानें नभोभागी प्रवेश केला. तेव्हां रात्र फार झाली सचव मंडळी आपआपले ठिकाणी गेली व मनांतील अस्वस्थता आणणारे विचार नाहींसे झाल्याकारणानें आप्पांस स्वस्थ विश्रांति घेण्यास मोकळीक मिळाली आणि त्याप्रमाणें आप्पा निद्रावश झाले.
 काळाला विलंब अगर घाई हीं बिलकूल माहित नाहींत. त्याची जी गती प्रथमपासून एकदां नेमलेली आहे त्याच गतीनें तो जात असतो. असो कांहीं दिवस लोटले. भेद आण- ण्याकरितां नेमलेल्या मंडळीनें आप भापली कामगिरी योग्य- रीतीनें बजाविली. 'किल्ल्यांतील भेद तर आणलाच, आतां नेटाने प्रयत्न केल्यास किल्ला हस्तगत होण्यास फार प्रय- न पडणार नाहींत ' अशी सर्वांची खात्री झाल्यावर संके- तानुसार एके दिवशीं लष्करांतून बुरजाचे खालपर्यंत सुरंग भरून जी तयारी केली होती, तिला अनि देतांच एकदम भडका उडून बुरुज खाली आला. अशा रीतीनें एकाची व्यवस्था केल्यावर मंडळीचें लक्ष दुसऱ्या बुरुजा- कडे जाऊन त्याचा विध्वंस करण्याचे स्वटपटीस मंडळी लागली. ही किल्ल्याची दुर्दशा पाहून किल्ल्यांतील मंड- ळीचें धार्चे दणाणले व कांही मंडळी वाट सांपडेल तिकडे पळू लागली. त्या मंडळीचा पाठलाग आप्पांचे सैन्यानें करून त्यांतील बहुतेक मंडळी कैद करून आणिली. फिरं- ग्यांच्या अधिपतीची लावण्यवती व नाजूक अशी स्त्री या संग्रामास भिउन कांहीं मंडळी बरोबर घेऊन परत