पान:लोकमित्र १८९५.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ३७ )

स्वदेशी जाण्याचे उद्देशानें जहाजांत बसून नित्रालेली पाहून आप्पांचे आरमारावरील कांहीं मंडळींनी त्या ज- हाजावर हल्ला करून तिला पकडून आणिलें व ही लावण्यलतिका सरकारांजवळच असणं योग्य असा विचा- र करून त्यांनी आप्पांसन्मुख तिला आणून उभी केली. तीस पहातांच आपले लोकांचे दुर्वर्तनाबद्दल अत्यंत संताप येऊन त्यांनी त्यांची बरीच संभावना केली व त्या फिरं- गी स्त्रीस आपली साक्षात् भगिनी असे मानून तिची योग्यप्रकारे समजूत केली आणि तिला त्यांचे चालीरिती- प्रमाणे वस्त्राभरणे देऊन मोठ्या गौरवाने परत किल्ल्यांत तिच्या स्वामीकडे पाठवून दिले. त्या साध्वीनेंही किल्लघांत परत गेल्यावर झालेली हकीगत आपले स्वामीस निवेदन केली आणि नंतर नम्रतापूर्वक प्रणाली की "तुझीं त्या- शीं कशासाठीं भांडतां ? तो पुण्यवान् आहे. मी तेथे असतां, इतकेंच नव्हे पण माझा प्राण सर्वस्वी त्याचे हा- त सांपडला असतां त्याने माझेकडे वांकडे नजरेनेही पाहिलें नाहीं. तेव्हां त्याशीं लदून आपणास यश येईल असें वाटत नाहीं." हा उपदेश ऐकून व आप्पांचे सद्गुणां- बद्दल अत्यंत आश्वर्यभरित होऊन त्यानें तह करून किल्ला आप्पांचे स्वाधीन करण्याचा निश्चय केला. असें करण्यांत वास्तविक त्याचा हेतु कांही अंशी वेगळा असेल. कारण, बाहेरून कुमक येण्याची आशा आतां उरली नव्हती आणि शिवाय आटोकाट प्रयत्न करून आप्पांनी किल्ला पाडण्यास सुरवात केली होती तेव्हां व्यर्थ प्राणहानि सोसून मग जो किल्ला त्यांचे हातीं द्यावयाचा त्यापेक्षां आधीच त्यांजपाशी तहाचे बोलणें