पान:लोकमित्र १८९५.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )

लावून रक्तपाताचें संकट टाळावें असा त्याचे मनांत वि- चार येऊन तो किल्ला देण्यास राजी असावा. कसेही जरी असले, तरी तें कारण पुढे येऊन त्याची समजूत पडण्यास मुख्य कारण आप्पांचे आंगचा सद्गुणच होय. असो, पुढें तह होऊन किल्ला आप्पांचे स्वाधीन झाला.
 खरोखर आप्पांच्या आंगचे गुणच कांहीं अलौकिक होते. ते केवळ भिष्म, मारुती वगैरेंचे प्रत्यक्ष अवतार होते असें ह्यटलें असतां तें अप्रयोजक होणार नाही. वाचकहो, त्या वेळीं नीतिशिक्षणाच्या शाळा होत्या असें नाहीं; आणि शिवाय त्या वेळीं धर्मबंधने दृढ असल्या- कारणानें साहजिक मनुष्याचे मन दुर्वर्तनापासून पराङ्मु- ख होई. राजबंधनापेक्षां धर्मबंधन हें फार श्रेष्ठ आहे. परंतु, सांप्रत धर्मास ग्लानि आली असल्याकारणानें अथ- तच मनावरचा एकप्रकारचा दाब कमी झाला आणि अ- व्यापारेषु व्यापार सुरू झाला. या धर्मास आलेल्या ग्ला- नीचें आवरण काढून टाकून धर्माज्ञेच्या खऱ्या स्वरुपाची समाजास ओळख करून दिली असतां जें काम नीतिशि क्षणाच्या हजारों शाळा घातल्या अगर हजारों व्याख्यानें दिली असतांही सफल होणें दुरापास्त तें सहज होऊन जाईल.



केरळकोकिळास लोकमित्राचा
परत अहेर.
खेप २ री .

  रा. रा. लोकमित्रकर्ते यांस.
 खालील चार ओळींस येत्या अंकीं जागा दिल्यास सर्व कलमबहाद्दरांवर मोठे उपकार होतील.