पान:लोकमित्र १८९५.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३९ )

केरळकोकिळ पुस्तक ६, अंक ११, पृष्ठ २९६ मध्ये कोकिळाचे एडिटरसाहेब आपल्या कलमबहाद्दर बंधूंशी शेलापागोटें देतांना ह्मणतात की " मासिक पुस्तककारां- शीं आणि वृत्तपत्रकारांशी आमचें नातें पडलें बंधत्वाचें. ते प्रतिमासी, प्रतिपक्षी व प्रत्याहिक आह्मांस कित्येक वर्षे नियमाने भेटत असून त्यांची आह्मीं मुळींच जर वि- चारपुस केली नाहीं, * * * आपले प्रेम त्यांस दर्शविलें नाहीं, तर आमच्याकडे निखालस कृतन्नतेचा आरोप ये- णार नाहीं काय ? "
 त्यांच्या ह्मणण्याप्रमाणेंच का होईना, मित्र व कोकिळ एकमेकांशी मोबदला नात्याने जर कधींच भेटले नाहींत तर के. को. पुस्तक ७, अंक ३, पृष्ठ ६८ मध्ये लोकमित्रास शेलापागोटें दिलें हें कोकिळाचे केवढे वर्णनीय अगांतुकीचें कृतज्ञत्व ! ! ! भेट न देणाऱ्या बंधुचरोबर जर एवढा कृतघ्नपणा, तर भेट देणाऱ्या बंधु- बरोबर किती असेल याचा वाचकांनींच विचार करावा.
 लोकमित्रानें अगांतुक कृतज्ञतेचा अत्यादरपूर्वक आभार मानून आपल्या २ व्या वर्षाच्या १० व्या अंकां- तून परत अहेर पोहचविला. ह्या अहेरानें कोकिळची दोन-अडीच वर्षे गुजरण झाली. हल्लीं तो अहेर जीर्ण झाला असावा असे वाटतें. कारण, कोकिळ पुनः अहेराची अपेक्षा दर्शवितो; त्या अर्थी त्याची इच्छा पुरविणें योग्य दिसतें.
 वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें व ग्रंथ यावरून जे विषय केरळकोकिळांत उतरून घेतलेले असतात त्या उताऱ्यास एडिटरसाहेव आधार लिहीत नसतात. यांतील इंगित एवढेच