पान:लोकमित्र १८९५.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४० )

दिसतें कीं, शाळेतील मुले जशी 'मनांतील अंक सांगतों ' ह्मणून कोर्डे घालून खेळतात, त्यांतीलच हा प्रकार आहे. असें जर नाही ह्मणावें तर ते आपल्या बंधूंच्या डोळ्यां- तील कुसळें पाहून हांसणार नसते. पहा के. को. पुस्तक ७ अंक ,अंक ३, पृष्ठ ६७ मध्यें बेळगांवच्या 'भारतमित्र ' मासिक पुस्तककारांना ह्मणतात - "शंभर वेळां वर्तमान- पत्रांतून येऊन शिळ्या होऊन आंबलेल्या आख्यायिका, विनोद, वर्तमानें, आपल्या मासिक पुस्तकांत देत गेल्या- नें * * * हलकेपणा पदरी येतो, हे आमच्या बंधूंना कभी बरं कळेल ? * * सारे वाचक अद्यापि मठ्ठ झाले नाहींत." परंपरां चालत आल्याप्रमाणें जो मज- कूर शंभर वेळां वर्तमानपत्रांतून येऊन गेला, तो याच शंभरांबरोबर आणखी एक वेळ भारतमित्रांत प्रसिद्ध झाला. व पुढे कित्येक लेखनकार असाच उतारा घेतीलही. आणि अशी पद्धत तर कोकिळाचीही आहेच. याणें वस- ईच्या किल्ल्यावरील भूताला उत्तर दिले आहे की- 'सयामच्या महाराजांस २६३ मुले असलेली बातमी आह्मी " केरळोपकारी मासिक पुस्तकांतून घेतली आहे" तसेच बानर सेतु, आकाशांत उडणारे मासे, बुद्धाचा दांत, सूर्यावरचा डाग, 'मायक्रास कोप ( सूक्ष्म दर्शक यंत्र ) मधून दिसणारा जलबिंदु' इत्यादि शिळ्या व आंबलेल्या गोष्टी शाळेतील क्रमिक पुस्तकांतून उतरून "ऊन त्या "लोकोत्तर चमत्कार" या सदराखाली कोकिळांत दिल्यामुळे शाळेतील मुले तर त्या वाचून वाचून अगदीं मठ्ठ झाली आहेत, शिवाय कोकिळ आपल्या डोळ्यांतील मुसळाकडे न पाहतां दुसऱ्यांची कुसळें दाखवितो व