पान:लोकमित्र १८९५.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

आपणाला सोडूनच बाकीच्या बंधूंना मोजूंं लागतो हा खुळा प्रकार पाहून तीं खट्टही झाली आहेत.
 कोकिळांत येणारे सारे विषय दुसऱ्याच्या पुस्तकांतून उतरून घेतलेले असतात याबद्दल विशेष परिस्फुट करीत बसावें तर मित्राची बरीच जागा अडवन वाचकांचे मन • पिटवावे लागेल, आणि शेला एकीकडे पागोटें एकीकडे होऊन मध्येच विषयांतर होत जाईल सबब थोडीशी पु- स्तकपरीक्षा व तुलनाशैली पाहून मग अहेरार्पण करूं.
 केरळकोकिळचे एडिटरसाहेबांकडून जें पुस्तकपरी- क्षण होतें, त्यांत सत्यतेचा आभाव असतो, याबद्दल ता- रिफ करावी तितकी थोडीच वाटते. या आमच्या ह्मणण्या- * स मेळ घालून पाहणें वाचकांस इष्ट असल्यास तपास करून पाहा:-- झांशीच्या राणीसाहेबांचें चरित्र, या पुस्तकासंबंधी संपूर्ण माहिती देणारे राणीसाहेबांचे चिरं- जिव, हें चरित्र (कादंबरी) रूपानें रचणारे महाराष्ट्र- कोकिळ चे कर्ते पारसनीस, या पुस्तकाच्या 'सत्कृतीच्या उत्तेजनार्थ ' पूज्य बुद्धीने ! स्तुत्य अभिप्राय देणारे केरळ- कोकिळचे एडिटर व एडिटराचे यजमान जनार्दन महादेव गुर्जर हे सर्व एका माळेतील मणी खरे ! तथापि, राणीसा- हेबांच्या चरित्रावर निःशंकपणे अभिप्राय देतांना के. को. एडिटरसाहेबांनी जरा तरी विचार मनांत आणावयाचा होता की — जर मी या चरित्रावर ओतप्रोत स्तुत्य परीक्षण लिहिलें, तर सत्येतिहासाभिलाषी ज्ञातेजन ग्रंथकारास दोष देतील तो वेगळाच; शिवाय पुस्तकाच्या असत्कृतीची छपवाछपवी करण्याबद्दल पांघरूण घातल्याचा आरोप ' तिरस्कार' न करितां मुकाट्यानें मला पदरीं ध्यावा लागेल.