पान:लोकमित्र १८९५.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

हा जर विचार त्यांच्या अंगीं नाहीं, तर के. को. पुस्तक ९, अंक ४, पृष्ठ ८९ मध्ये उद्गार कां काढावे ?
 “आह्मी एखाद्याचे पाठीस लागलों ह्मणजे ' दे माय धरणी ठाय ' करून सोडितों. आणि एखाद्याचे स्तुतीस लागलों ह्मणजे त्यास अगदीं हरभऱ्याचे ढाळ्यावर चढ- वितों; पण सत्कृतीबद्दल मनांत पूज्य बुद्धि उत्पन्न होणं, आणि असत्कृतीबद्दल मनांत तिरस्कार उत्पन्न होणे, मनुष्य (स्वार्थ ) स्वभावाचे सहज गुण आहेत. पहिलीस उत्तेजन देणें आणि दुसरीस वचक बसविणें हें पुस्तक- परीक्षेचे कर्तव्यकर्म आहे."
 या कर्तव्यकर्माप्रमाणे चरित्रलेखकाच्या सत्कृतीस उत्तेजन देण्याकरितां कोकिळाने आपल्या भरपूर तारफेची कमाल केली होती, तर चरित्रलेखकाची असत्कृति इंदु- प्रकाशांत कां बाहेर पडली असावी बरें ? चरित्रकार पार- सनीस यांनी राणी साहेबांच्या वर्तनाविषयीं तथ्य गोष्टी गुप्त ठेविल्या आहेत; याबद्दल वर्ष ३४, अंक १९, तारीख १३ माहे मे सन १८९५ चा इंदुप्रकाश वाचल्यास वाचकांशीं सव कांहीं कळून येईल. अशीच आणखी एक- दोन पुस्तकपरिक्षेची उदाहरणें दाखविली असती; परंतु विरुद्ध बाजूस कोकीळचे एडिटर बिलकूल लक्ष देत नाहींत. आत्मस्तुति - परनिंदा ह्या गोष्टी पूर्णपणे त्यांच्या अंगी भिन- ल्या आहेत. के. को. पुस्तक ९, अंक ६, पृष्ठ १३८ मध्ये पुन्हा ह्मणतात –
 "झांशीच्या राणीच्या चरित्रांत आह्मांस ह्मणण्या- सारखा कोणताही दोष आढळला नाहीं. त्यांनीं आपल्या