पान:लोकमित्र १८९५.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४३ )

कृतींत दोष ! (सत्यपणा ) ठेविला नाहीं; ही चूक त्यां- चीच (पारसनीस ) आहे. "
 'माझा गुण तो भला, ' असें ह्मणणाऱ्या मनुष्याचे म- न सत्य गोष्टीकडे वळविणें ह्मणजे, सशाचें शिंग प्रयत्नानें मिळविल्यासारखेंच होईल. त्या अर्थी आणखी एखादे 'वेळीं के. को. ची पुस्तकपरीक्षणपद्धत दाखवितां येईल.
 अशीं खरी परीक्षणें विविधज्ञानविस्तार व इंदुप्रकाश- सारख्या पत्रांतून बाहेर न येतील, तर महाराष्ट्रापासून तों तहत केरळ देशापर्यंत उभय वेषधारी कोकिळ बंधु, स्व- कपोलकल्पित लेखणीच्या जोरावर व रेलचेल आत्म- स्तुतीच्या उद्गारावर कावळ्यास कोकिळ ह्मणून विकणार असते. बाबांनो अशा कृतीनें कोकिळत्व प्राप्त होत नाहीं. प्रत्यक्ष कोकिळाचे गुण वेगळेच आहेत.
 न जाणो, अशा प्रकारच्या परीक्षणाची एखादी वेळ आल्यास आपल्या योजक श्लोकानेंच आपली थट्टा उड- वून घ्यावी लागेल; ह्मणूनच चवथ्या वर्षाच्या केरळको- किळ पुस्तकावरचा काकः कृष्णः पिकः कृष्ण को भेदः पि- क काकयोः ॥ हा श्लोक एडिटरबहाद्दरांनी काढून टाक- ला असावा असें वाटतें. एडिटरराव हो, अशी जरी फिरवाफिरव केली, तरी सत्यासत्यतेची निवड होतेवेळी वसंतसमये प्राप्ते काकः काको पिकः पिकः ॥ ठरणार, हैं सांगायला नको. सारेच डोळे झांकून बसले नाहींत.
 बिचारे खांद्यावर विणा घेऊन उदरनिमित्य गांवोगांव भटकणारे कथेकरी बुवांची इतकी स्तुति करितो कीं, मासिक पुस्तकाचे सबंध अंकावर अंक भरून छापलेली चरित्रें, वाचून वाचून वाचक विटले तरी त्याची मनतृप्तीच