पान:लोकमित्र १८९५.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४४ )

होत नाहीं. पुनः पुनः बुवांच्या स्तुतीचे उद्गारदर्शक लेख ' परिशिष्ट' या सदराखाली खुपसतो; फार काय सांगावें, आज सान्या पृथ्वीस बहु भूपणीय अशा एखाद्या नामांकित विद्वानाची बरोबरी करण्याकरितां त्याच्या वरच्या खुर्चीवर बुवास नेऊन बसवितो, येवढेच नव्हे तर शुक्र, कालिदासादिकांची पदवी हिसकावून घेऊन बुवास 'कविवर्य' बनवितो एवढें हें सारें स्वक- पोकल्पित औदार्य आपल्याकडून आपल्या इष्ट बांधवां- वर घडल्याबद्दल आपल्या श्रमाचें आपणच सार्थक मानून घेतो. ( वर्ष ७, अंक ९-१०, वर्ष ८, अंक १. ) कोकिळाने केलेली एवढी स्तुति ऐकण्यास बुवा जिवंत राहिले नाहींत. आज असते तर त्यांनी आपला विणाच फेंकला असता; आणि उपासमार कधीं होईल तो दिवस पाहतां येईल ह्मणून घरी स्वस्थ बसले असते. मेलेल्या शीस घडाभर दूध !
 बेळगांव मुक्कामी रा.व. बापट या गुरुवर्यांच्या हाता- खालीं रा. ब. पंडीत यांनी अभ्यास केला. ही गोष्ट त्यांच्या चरित्रांत दिली आहे. त्याचप्रमाणे कै. वा. य- शवंतराव आठल्ये यांनीं रत्नागिरी मुक्काम डाक्टर भांडार- कर ह्या गुरुवर्यांच्या सुबोधानें संस्कृत व इंग्रजी इत्यादि गहन भाषेची मार्मिकता समजून घेतली; आणि तिच्या योगानेच अभ्यासक्रम पुढे चालू ठेविला. ही गोष्ट कोकि- ळाने कां बाहेर आणली नाहीं ? कदाचित् एडिटरसाहे- बांना माहिती मिळाली नसेल! तें राहूंद्या, पंडितसारख्या जगमान्य महात्म्यांची चरित्रं सर्वसाधारण पुरुषांच्या चरित्रांनंतर आपल्या पुस्तकांत छापून काढिलों ह्मणजे