पान:लोकमित्र १८९५.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४५ ) महात्म्यांची बरोबरी सर्वसाधारणांस येत नाहीं. किंवा सर्वसाधारण मनुष्य, महात्म्यांचे थोरवीस चढत नाहीं. हें तर उवडच आहे. असे खोट्या तराजूनें तोलणारे एडिटर, लोकवंद्य सत्पुरुषांची चरित्रे व्याजस्तुतीनें लिहून आपल्या भिकार पुस्तकांत कां घुसडतात ? आणि आपल्या अल- "त्य लेखाने त्यांच्या चरित्रास विटाळ कां लावितात ? यां- ना कोणी एवढे टुमणे लाविलें आहे का कोणी जुलूम केला आहे ? कोकिळाचें चरित्रलेखन, पुस्तकपरीक्षण व शेलापागोटें ह्या गोष्टी लिहिण्याच्या शैलीविषयीं वि- चार करून पाहतां एवढे दिसून येतें कीं, आत्मस्तुतिप- रनिंदेचें एक प्रेक्षणीय प्रदर्शनच होय. चालू सालों जुलाई महिन्यापासून केरळकोकिळा शेलापागोट्याचे प्रदर्शन खुलें ठेविलें आहे. हा समारंभ साजरा करण्याकरितां आपणास मोबदला भेट देणाऱ्या बंधूंना आमंत्रणे दिली आहेत पुढेही देणार आहे. आमंत्रणावरून आलेल्या कलमच - हाद्दर बंधूंना शेलापागोटीं दिलीं आहेत. आपणास प्रति- मास भेट देणान्या बंधुकींच खानापूरचा लोकमित्र हा एक आहे, असें समजून त्यासही शेलापागोटें दिलें आहे पण गंमत ही आहे कों, कोकिळ परनिंदेविषयीं किती लुब्व आहे, हैं के . को. वर्ष ९, अंक ७, पृष्ठ १६१ यांत दिसून येते. तो ह्मणतो की-
 "नवीन नवीन मासिक पुस्तकें जेवढीं ह्मणून आमच्या- कडे येतात, तेवढीं सारी अभिप्रायार्थच येतात असा आमचा तरी निदान समज आहे. "
 असा जर समज आहे तर, कोकिळ लोकमित्रास मो- बदला येत नाहीं, किंवा लोकमित्र कोकिळास मोबदला