पान:लोकमित्र १८९५.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४६ )

जात नाहीं; अशी स्थिति असतां कोकिळानें लोकमित्रास शेलापागोट्याच्या सदराखाली आणणें ह्मणजे केवढे धा- ष्ट ! मग तें लिहिणें निंदेचें असो अगर स्तुतीचें असो. हा त्याचा आडदांडपणा होय की नव्हे याचा विचार वाचकांनीच करावा.

 कोकीळ - एडिटर हो, निराधार आणि असत्य लेखाचा प्रसार करण्यास तुझी तुमच्या लेखणीस कागदी घोड्यावर बसवावें, तिजकडून घोड्याला " * हवे तसें नाचवावें, एक टांच मारली की दुडकी, तुरकी, सात्रक, भरधांव, पाहिजे तसा सोडावा. कोणाची मनाई नाहीं. ( स्वतःची लेखणी. काजव्याला सूर्य आणि सूर्याला काजवा ह्यटलें तरी चालतें ! ) सारे मैदान खुले. कसोटी नको, परीक्षा नको, ( पोकळ ताठारलेल्या मनुष्यास खरी परी - क्षा लागणार तरी कशी ? ) कांहीं नको. हातांत चाबूक घेतला व रिकिबीत पाय ठेविला कीं झाला चाबूकस्वार ! मग भला असो की बुरा असो, सरशहा प्रयोगाची सुरवात." करायाला धांवावें, त्या समयीं वृथाभिमानविर- श्रीनें तुमच्या बाहूंना (स्वेच्छ लिहिण्यास ) स्फुरवावें, मनःकंडूचें शमन करण्याकरितां भोंदूस साधु व साधूस भोंदु, गाजीस पाजी व पाजीस गाजी, व्यासाला वायस आणि वायसाला व्यास व खऱ्याचें खोटें आणि खोट्याचें खरें ठरवून अजागळ लेख लिहिणें हें लेखणी- बहाद्दराचे काम नव्हे. तर " आपली हंडी उतरविण्याक- रितां दुसऱ्याची हंडी चढवून धन्याची मेहेर संपादणाराचें काम आहे. " असें निःशंकपणे ह्मणर्णे प्राप्त आहे.


 * के. को. पु. ६, पृ. २५५.