पान:लोकमित्र १८९५.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४७ )

 एखाद्या यजमानाची व कार्यकत्यांची मेहेर संपादन करून घेतली तर सहज आपल्यास पैसा मिळतो. मेहेर संपादन करून घ्यावी तर यजमानाच्या मर्जीप्रमाणें वागणें अवश्य आहे. मर्जी प्रमाणें वागावें तर त्याने पश्चिमेस सूर्य उगवतो ह्यटलें कीं ' जी सरकार, होय ' ह्मणून " मुखस्तुति केली तरच आपले कार्य सिद्धीस जाते. मरा- ठ्यांपासून पैसा मिळतो तर त्यांचे इष्ट हेतुप्रमाण लेख लिहिले, परभापासून पैसा मिळतो तर त्याचे इष्ट हेतुप्र- मार्णे लेख लिहिले, गांवस्करासारख्यांचा महदाश्रय मि तो तर त्यांचे इष्ट हेतुप्रमाणे लेख लिहिले, गुर्जरापासून निर्वाह चालतो तर त्याचे हेतुप्रमाणे लेख लिहिले; सा- रांश आपल्यास खाना ज्या पूरच्या रहिवाशाकडून मिळतो, तोच आपला साहेब खान, तोच आपला देश आणि तोच आपला मित्र समजून त्याची महती वाढण्या- करितां आत्मस्तुतिपर परीक्षण लिहून खाना संपादन केला, अशा प्रकारच्या लेखकास कलमत्रहाद्दरीचा बाणा कसा प्राप्त होईल ? हे सत्यदेवते, कलियुगारंभाचे वेळीं मुख्य प्रधानकीची जागा लेखणीजवळ सोपवून तूं गुप्त जाहलीस. त्या लेखणीचा दुरुपयोग हल्लींचे हे आर्य पुत्र करितात तो पाहण्यास तूं जर जिवंत असतीस तर कोकिळ एडिटरापुढे खरोखर आत्महत्त्या करून घेतली असतीस यांत संशय नाहीं !
 कावळ्यानें आव घालून कोकिळाचें नांव धारण करून जगांत साव होऊं पाहिलें, तर निरीक्षणची वेळ आली ह्मणजे मग कृष्णा तीरीक्षण न लागतां पळता पळतां आठवेल कीं, कुचेष्टखोर लेखानें प्रतिष्ठा तर वाढली नाहीं