पान:लोकमित्र १८९५.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५० )

भरतखंडांतील राजांच्या पदरी असलेले भाटांचें वास्त- व्य हैं केवळ नवीन नसून पूर्वीच्या तिन्ही युगांतील रा- जांजवळ भाट - बंदिजन-होते अशाबद्दल ग्रंथांतरीं दाखले सांपडतात. कृतयुगांत चंडीजवळ वेलंग व वळास हे दोन भाट होते; व शेषाजवळ भीमसी नांवाचा भाट हो- ता. त्रेतायुगांत बळिराजाजवळ पिंगल, व रामराजाज- वळ रंपाळ, भारोट असे भाट होते. द्वापारयुगांत पांडवां • जवळ संजय, व नैमिषारण्यांत शौनकादि ऋषींजवळ सूत हे भाट होते. आणि अलीकडे कलियुगांत विक्रम- राजाजवळ वेताळ, पृथ्वीराजाजवळ चंद्रभाट, अकबर- बादशहाजवळ गंगभाट, आणि शिवाजीराजाजवळ भू- षणकवि; असे प्रसिद्ध भाट होते.
 वर वर्णन केलेल्या भाटांतील अगदी शेवटचा जो ( भूषणभाट त्यानें आपल्या लोकोत्तर मधुर वाणीने छत्र- पति शिवाजीमहाराज यांचें चरित्र गाऊन महाराष्ट्र दे- झांतील लोकांवर अविस्मरणीय असे उपकार केले आहेत. असे असून कित्येक महाराष्ट्रीयांस त्याचे नुसतें नांवही माहीत नाहीं; ही अत्यंत विस्मयावह गोष्ट आहे. करितां सांप्रत उपलब्ध असलेल्या त्रोटक माहितीच्या आधारानेंच आली त्या गुणवान् व थोर कविसत्तमाचें अल्प चरित्र वाचकांस सादर करीत आहों.
 कानपूर जिल्ह्यांत यमुना नदीचे कांठीं त्रिविक्रमपूर ह्मणून एक नगर होतें. त्यासच हल्लीं टिकमापूर असें ह्मणतात. त्या ठिकाणी रत्नाकर या नांवाचा काश्यपगोत्री कनोजिया ब्राह्मण रहात असे. हाच रत्नाकर आपल्या भूषणकवीचा पिता होय. याचें आडनांव त्रिपाठी असें