पान:लोकमित्र १८९५.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ५१ ) होतें. रत्नाकराने देवीची आराधना केल्यावरून तिच्या प्रसादानें त्यास चार पुत्र झाले. त्यांचीं नांवें चिंतामणि, भूषण, मतिराम, आणि जटाशंकर ऊर्फ नीलकंठ. या सर्वात चिंतामणि हा वडील होता. बाकीचे तिघेही एका- पेक्षां एक वयानें लहानच होते. हे चौघेही बंधु मोठे विद्वान् असून उत्तम कवीही होते. त्यांनीं त्या वेळच्या निरनिराळ्या 'राजांचा आश्रय करून आपल्या कवित्वगुणानें त्या त्या राजांस प्रसन्न करून घेतलें होतें. त्यांतील भूषणकवि हा आपल्या शिवाजीमहाराजांच्या आश्रयास होता.
 छत्रपति शिवाजीमहाराजांचे पदरीं जीं कित्येक अ- नुपम मानवरत्ने होतीं, त्यांपैकींच वर सांगितलेला कवि भूषण- भूखन - हैं एक अत्यंत मौल्यवान् मानवरत्न होतें.-- या कविश्रेष्ठान आपल्या प्रौढ, गंभीर, आणि उदात्त अ- शा वाणीनें हिंदुस्थानी भाषेत छत्रपति शिवाजीमहाराज यांचें प्रासयमकप्रचुर अशा काव्यबंधांत अत्यंत सुरस असें चरित्रवर्णन केलें आहे. या सर्वालंकारपूरित रसा- ळ चरित्रास त्यानें “शिवभूषण शिवभूखन-" असें नांव दिले आहे.
 भूषणकवि हा प्रथमतः दिल्ली येथें बादशहाचे पदरीं त्याचा वडील बंधु चिंतामणि होता त्याजपाशीं रहात असे. कांहीं दिवसांनीं घरांतील माणसांची कुरकुर कानी आल्यावरून "आह्मास यवनांचें अन्न भक्षावयाचें नाहीं " असा बहाणा करून तो भावापासून निघाला. भावापासून वेगळे निघण्याकरितां त्यानें वरील कारण पुढे केलें असें जरी होतें, तरी वस्तुतः यवनांविषयीं त्याचें मन शुद्ध न- व्हतेच. त्यामुळे भूषणकवि दिछींतून निघून कमाऊनचे