पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/४०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४०० : शतपत्रे

५. जातिभेद

पृष्ठ २८७: ते शास्त्र लिहिण्यापूर्वी व पश्चात असा नियम असेल असे वाटत नाही
 लोकहितवादींचा कयास खरा आहे. 'जन्मतः शूद्र असलेला माणूस संस्कारांनी द्विजपदवीस योग्य ठरतो,' 'ज्याच्या ठायी संस्कारजन्य शील दिसून येईल त्यास ब्राह्मण म्हणावे, 'शूद्राअंगी ब्राह्मणाचे गुण असल्यास त्यास ब्राह्मण म्हणू नये.' अशी अनेक वचने संस्कृत वाङ्मयात आढळतात. (जिज्ञासूंनी 'अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ' व 'स्पर्शास्पर्श' ही श्रीधरशास्त्री पाठक व पंडित सातवळेकर यांची पुस्तके पाहावी.)

पृष्ठ २८९: बाजीरावास तर नेहमी हेच (जेवणावळीचे) वेड होते.
 १८०५ ते १८०९ या चार वर्षांच्या काळात केवळ इंग्रज अधिकाऱ्यांना मेजवान्या ('बडा खाना') देण्यासाठी (दुसऱ्या) बाजीरावने जवळजवळ तेरा हजार रुपये खर्च केले असे पेशवे दप्तरातील कागदपत्रांवरून (क्र. २२) दिसते. (पाहा - महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना- डॉ. रा. शं. वाळिंबे, पृ. २८.) इतरांसाठी केलेल्या मेजवान्या व रोजच्या पंक्ती वेगळ्याच. यावरून बाजीरावाचे भोजनवेड स्पष्ट होईल.

पृष्ठ २९१: शूरत्व या मुलखातून गेले
 पृष्ठ --- वरील 'पुणे वर्णना'तील उतारा या संदर्भात पुन्हा लक्षात घेण्याजोगा आहे.

७. आमचे राजकारण व राज्यकर्ते

पृष्ठ ३२६: त्यास फ्रेंच रिवोल्युशन म्हणतात
 पृष्ठ —-- वरील ('फराशीस यांची राज्यक्रांती' यावरील) टीपा पाहा.

पृष्ठ ३२६: मागे पेशवाईत... दंगे झाले
 (१) पानिपतच्या युद्धात सदाशिवरावभाऊ (भाऊसाहेब) धारातीर्थी पतन पावले, पण त्यांचा पत्ता लागला नाही. याचा फायदा पुढे माधवराव पेशव्यांच्या