या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०९ शुद्ध हेतू. या झाडीतून पर्वतांची उंच शिखरे आपली डोकीं वर काढीत आहेत असे दिसते. मधून मधून सूर्याकरणे पडत आहेत आणि त्यामध्ये, वनपशू आनंदाने बागडत आहेत, पक्ष्यांचा एकच किलकिलाट होऊन राहिला आहे असा हा एकच चित्तवेधक थाट जमून गेला आहे." वगैरे. -- लोकहितवादींची सर्व पुस्तकें आज उपलब्ध नाहीत. मतभेदांची वावटळ ज्याला बाधावयास नको अशी " ऐतिहासीक गोष्टी" सारखी पुस्तकें देखील जितकी वाचली जावी तितकी जात नाहींत. कालांतराने त्यांच्या इतर पुस्तकांपेक्षा हीच पुस्तकें कदाचित् जास्त टिकाऊ व महत्त्वाची ठरतील. परंतु लोकहितवादी या पुरुषाचे लोकहितवादित्व या पुस्तकांत नाही. ते जर कशांत असेल तर यांतच आहे की, या देशात दोन विजोड संस्कृतींचा मिलाफ होत असतांना. त्यातल्या त्यांत जास्त प्रगमनशील व जोराची अशी जी पाश्चात्य संस्कृती तिचे मर्म ओळखून ती आपल्या देशांत रूढ व्हावी म्हणन त्यांनी विचारांनी व आचारांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. कोपर साहेबांची एकनिष्ठ सेवा करून त्यांनी आपले घर भरले नाही.आपल्या पांडतांचे ज्ञान कुचकामाचे व भटांनी समाजव्यवस्थेत गोंधळ उड. वून दिला असे त्यांनी म्हटले असेल, व आहेही, तर तें केवल इंग्रजी संस्कृतीची स्तुती करण्याकरितांच म्हटले असें नाही. त्यांनी ज्ञानाची योग्यता त्यांच्या उपयुक्ततवेरून मापिली असली तरीही त्यांत काही वावगें नाहीं. कालिदासाच्या मेघदूताच्या एका प्रतीची व पसाभर पुटाण्यांची योग्यता सारखी नव्हे हे कबल: दपारच्या बारा वाजतां कदाचित् फुटाण्यांची योग्यता जास्तही होईल. एकंदरीत लोकहितवादींचे लेखन, त्यांनी काय लिहिलें आरि त्यामुळे शाहण्यांच्या व मूखीच्या मनाला काय वाटलें यावरून केवळ ठरवावयाची नाही. ज्या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी त