या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. वर्षांचा वसूलही एक रकमेने इंग्रजांनी परत दिला. पेशवाई असतांना हात चालत असे, केवळ सरंजामी उत्पन्नाखेरीज मिळकतीच्या अनेक वाटा होत्या, तो प्रकार बंद होऊन सरंजामाचे गांव परत मिळण्याकरितां देखील बाजीरावांना स्वतः मध्ये पडावे लागले, चार वर्षे विवंचनेंत खस्ता खाव्या लागल्या. त्या सर्व प्रकारांचा परिणाम हरीपंतांच्या मनावर फार विलक्षण झाला. एल्फिन्स्टन साहेबांनी पेशवाई बुडवली ही गोष्ट ते आजन्म विसरले नाहीत. साहेबबहादूर पुढे कमिशनर व गव्हर्नर असतांना मधून मधून पुण्यास येत. व त्यांची स्वारी पुण्यांतून फिरावयास वगैरे निघे. शुक्रवारांत देशमुखांचा वाडा आहे त्या बाजूने स्वारी कधीकाळी गेलीच तर त्या साहेबाचे तोंड पाहण्यास नको म्हणून ते खिडकीकडे पाठ करून बसत असे सांगतात. जुन्या पिढीतील माणसांच्या मनोभावना किती तीव्र असत याचे हे एक चांगले उदाहरण आहे. ते कसेंही असो. बदललेल्या परिस्थितीला अनुसरून आपणही बदलले पाहिजे त्याशिवाय, केवळ जुने खानदानी, घराणे म्हणून, फार दिवस निभाव लागणार नाही ही मात्र .. जाणीव त्यांना खरोखरीच असावी. या वयांत स्वतः एकादा नवीन उद्योग करण्याजोगी त्यांची स्थिती नव्हती. त्यांचे वडीलपुत्र परशरामपंत हेही अगोदरच कर्ते व संसारी बनले होते. चिंतोपंत व गोपाळराव या दोन लहान मुलांना मात्र बदललेल्या परिस्थितीला अनुरूप असे शिक्षण देण्याची त्यांची इच्छा व तयारी असावी असें गोपाळरावांच्या लहानपणच्या ज्या चारदोन गोष्टी नमूद आहेत त्यांवरून दिसते. त्यांचा उल्लेख प्रसंगाने पुढे येणारच आहे. हरीपंतास एकंदर चार पुत्र होते. त्यांपैकी पहिले परशरामपंत हे पहिल्या बायकोपासून झालेले, दुसऱ्या बायकोपासून चिंतोपंत, गोपाळराव, व गोविंदराव असे तीन. यांपैकी गोपाळराव हे आमचे चरित्रनायक