या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ लोकहितवादी. ज्ञानचक्षु पत्राचे माजी संपादक ) वगैरे मंडळी असत. यांच्यापैकी वामन ( राव ) रानडे हे तरुण गृहस्थ, फार चौकस, व सभोवती काय चालले आहे याचे मार्मीकपणाने निरीक्षण करणारे असे होते. त्यांची पुढील ७८ वर्षे गोपाळरावजींच्या घरीच कारकुनींत गेली. व इतर गृहस्थांच्या पुष्कळ बोधप्रद व मनोरंजक गोष्टी त्यांना प्रत्यक्ष पहावयाला सांपडल्या. वामनराव हे गरीब, आणि अविवाहीत होते. व त्यांच्याशी हितगूज सांगण्याजोगें प्रेमळ माणूसही कोणी नव्हते. पण मनांत विचाराविकारांची खळबळ फार, ती कुठे तरी विचाराला वाव मिळाल्याखेरीज चैन पडू देत नसे. यामुळे ते आपले मनचे गुपित लेखणी आणि कागदांची एक स्मरणवही यांजपाशीं मोठ्या नियमितपणाने व कळकळीने सांगत. वामनरावजींच्या या " स्मरणवह्या " त्यांचे घरीं आहेत व त्या त्यांचे चिरंजीवांकडून मला पहावयाला मिळाल्या होत्या. त्यांत बारीकसारीक अशा पुष्कळच गोष्टींची टिपणे आहेत. गोपाळरावजींच्या पुणे, ठाणे, मुंबई, येथील प्रवासांच्या तारखा, त्यांच्या चिरंजीवांची जाणींयेणी, सार्वजनीक महत्त्वाच्या प्रसंगांची टिपणे, वक्तृत्त्वोत्तेजक सभेतील वादविवादांची टिपणे, इत्यादी पुष्कळ माहिती-बरीचशी टिपणवजाच–पण कांहीं थोडी विस्तृतपणाने दिलेली आहे. तीवरून नाशीक येथील त्या चार वर्षीच्या घडामोडींची कल्पना थोडीशी करितां येते, व लोकहितवादींच्या तत्कालीन चरित्रावर थोडासा प्रकाश पडतो. या काळांत गोपाळरावांना सरकारी काम बरेंच असे. शिवाय कुटुंब मोठे, मुलें की होऊन संसाराला लागली होती व लागतही होती, त्यामुळे घरांत जाणाऱ्या-येणारांची, पै-पाहुण्यांची, वर्दळ फार. फुरसतीने लेखनाला वेळ मिळत नसे, व वयोमानाप्रमाणे पूर्वीइतकें कामही त्यांच्या हातून होत नसे. म्हणून वामनराव हे त्यांचे लेखनाचे