या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिंहावलोकन. विलक्षण होता, की, कदाचित् हे काम ताबडतोब त्याच्या बरोबर होणे हीही गोष्ट त्यावेळी कदाचित् अशक्य वाटली असेल. काम झालें नाही एवढे मात्र खरें. व त्यामुळे नव्याजुन्यांमधील दुवा सांधण्याचे काम एका पिढीने मागे पडले, हीहि गोष्ट तितकीच खरी आहे. हे काम करावयाचे कोणी? अर्थातच इंग्रज अधिकाऱ्यांपैकी ज्यांची सदिच्छा होती ते एल्फिन्स्टन, बेटिकसारखे अधिकारी व ज्यांना नवीन संस्कृतीचे रहस्य समजले, त्याचप्रमाणे आपल्या गुणदोषांचे ज्ञान झालें असे आपल्यांतीलच शहाणे, वजनदार पुढारी यांनी मिळून हे काम करावयाचे होते व तसेंच तें व्हावयास आरंभही झाला होता. बंगाल्यांत राममोहनराय, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन,ईश्वरचंद्र इत्यादि मंडळींच्यावर हे काम पडले, तर आमच्या महाराष्ट्र मुंबईकडे, नाना शंकरशेट, गोपाळराव देशमूख, दादाभाई नौरोजी, कर्सनदास मूळजी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, जीजीभाई बॅरोनेट अशा निरनिराळ्या जातीतल्या निरनिराळ्या पुढाऱ्यांवर पडले. तेव्हां त्या काळाचे स्वरूप लक्षात घेतां " नृपतिजनपदानां दुर्लभकार्यकर्ता " अशा कोटींतील जी पुढारी मंडळी त्यावेळी तयार झाली त्यांत गोपाळरावांचे नांव घालावे लागेल असे मला वाटते. हे गोपाळरावांच्या चारित्र्याचे मर्म आहे. आतां गोपाळरावांनी आपले हे काम कसे केलें,त्यांच्या शिक्षणाचा,परिस्थितीचा उपयोग त्यांना कितीसा झाला, व परिस्थितीमुळे त्यांना अडचणी काय काय आल्या हे विस्ताराने पहावयाचे आहे. पेशवाईअखेरपासून तो राणीचा जाहीरनामा हातांत येईपर्यंतच्या मधल्या काळाचे जर वर्णन करावयाचे असेल तर त्याला ' The Period of Benevolent Despotisim ' असें नांव द्यावें असें आम्हांला वाटते. आपली संस्कृती श्रेष्ठ प्रकारची आहे खरी; पण माणसाच्या अंगी असलेल्या वैयक्तीक (Private) सद्गुणांचा विकास