या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. हात त भांडण करण्याची सवड पदार्थ पानाच्या प्रवृत्ती दृष्टीने पाहतांना अत्यंत मार्मीक केले आहे असे वाटते. मनुष्यांचे एकमेकांतील वैयक्तीक व सामाजीक व्यवहार नीट चालत नाहीत याचे कारण आशा, लोभ, क्रोध, इत्यादी मनाच्या प्रवृत्तींत आहे. मनुष्याला पाहिजे ते व पाहिजे तेवढे पदार्थ परमेश्वराने फुकटच दिल असते व प्रयत्नच करण्याची जरुरी ठेविली नसती तर माणसांची एकमेकांत भांडणे झाली नसती. व मग कायद्याने, नियमांनी किवा धर्मबंधनांनी मनुष्याचे नियंत्रण करण्याचे कारणच पडले नसते. " परंतु ईश्वरी संकेत असा आहे कीं; जसजसे पदार्थ मनुष्यास पाहिजेत तसतसे त्याने ते निर्माण केले पाहिजेत....परंतु यालोकी भ्राता व अज्ञान फार आहे, तेणेंकरून ईश्वराने मनुष्यास जे पदार्थ उद्योगान शोधून काढण्यास सांगितले आहे त्यांतून कितीएक सांपडावयाच आहेत व त्यांचा अंत नाही; परंतु जर सर्व सांपडतील तर सर्व सुखा होतील. परंतु असा काळ कधी येईल तें तर्कानेही समजणे कठीण आहे. यास्तव मनुष्यमात्राचा धर्म असा असावा की, (त्यांनी) ह पदार्थ शोधण्याचा प्रयत्न सर्वदा करावा. अनर्थमक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम्।। अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्रदुर्लभः ॥१॥ ....म्हणून मनुष्याने असा उद्योग करावा की, जितकें समजेल तितकें शिकत जावें, ईश्वराने अक्कल दिली आहे या अकलेच्या जोरान मनुष्यांनी एकमेकांच्या बुद्धिबळेकरून ज्ञानाचा पाठलाग करावा.. म्हणजे त्याचे पोटीं सूख आहे. ही गोष्ट सिद्ध आहे. मनुष्याचे वयक्ताक व सामाजीक कल्याण ही गोष्ट प्रयत्नाने साध्य होणारी आहे. तव्हा प्रयत्न करण्याची बुद्धी ज्यामुळे विकास पावेल तसे करणे हे धमाच काम. या बुद्धीचा गैरे उपयोग लोभामुळे किंवा मोहामुळे मनुष्याच्या हातून होऊ नये एवढ्याकरितांच केवळ एवढ्या एकच कारणाकारता