या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. लोक पार्लमेंट व स्वराज्य भोगतील-वगैरे असे होईल यांस संशय नाहीं; अशी मागील इतिहासावरून कल्पना होते आणि हे तथ्य आहे. अशी खातरजमा आहे." - शतपत्रांत गोपाळरावांनी जी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत. त्याचे येथपर्यंत दिग्दर्शक केले आहे. या मतांचा अनुवाद पुढे सर्व आयुष्यभर थोड्या फार फरकाने ते करीत होते. पेनशन ऐऊन ते पुण्यास येऊन राहू लागले त्यावेळी त्यांनी स्वाध्याय म्हणून जो ग्रंथ लिहिला आहे त्यांत, व विशेषतः त्याच्या शेवटी जोडिलेल्या परिशिष्टांत याच मतांची पुनरावृत्ती झाली आहे. ग्रामण्ये, बहिष्कार इत्यादिकांचे कटु अनुभव गोपाळरावांना जसजसे स्वतःच्या आयुप्यांत आले, व बाहेर प्रांतांत फिरून लोकांची मागासलेली स्थिती जेव्हां प्रत्यक्ष नजरेने त्यांनी पाहिली तेव्हां आपण म्हणतो ते बरोबर आहे असा विश्वास त्यांना जास्त जास्त वाटू लागला व त्यांची मतें सुधारणेला जास्तच अनुकूल झाली. थोडासा फरक एवढाच झाला की, प्रार्थनासमाज, आर्यसमाज, थिऑसफी इत्यादी धर्माच्या पुनरुज्जीवनाकरितां चाललेल्या अनेक चळवळींचा व विशेषतः आर्यसमाजाच्या चळवळीचा त्यांच्या मतांवर अनुकूल परिणाम होऊन ( कदाचित् अहमदाबाद येथे दयानंदस्वामींचा निकट परिचय झाला त्याचे हे फळ असेल ) ते शेवटी शेवटीं वैदीक धर्माचा पुरस्कार करीत असत. वेदांत जे सांगितले आहे त्याचा पुन्हा उद्धार केला पाहिजे, व मधल्या काळांत जे बरेचसें स्मृती-शा-रूढी यांच्यामुळे आमच्या रीतीरिवाजांत घुसलें आहे तें काढून धर्म शुद्ध केला पाहिजे, अशा मतांकडे त्यांचा कल (या) अखेरच्या दिवसांत झुकत होता की काय, अशी शंका स्वाध्याय हें पुस्तक वाचतांना पुष्कळ वेळां मनांत यते. दयानंदाच्या शिकवणीचा एवढा बरीक परिणाम झालेला दिसतो की, जुन्याचा अभिमान