पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) येळकोट नगर वाचनालय, सासारा. . घा सर्वसामान्य माणूस जेव्हा देवदेवतांचे मानुषीकरण करतो आणि त्यांचं आयुष्य स्वत:च्या नजरेतून पाहतो. त्यांचे गुण-दोष न्याहाळतो, तेव्हा त्यांचं लोकगीतांमधून मोठं मनोहरी स्वरूप पाहायला मिळतं. खंडोबा हे कितीतरी लोकांचं कुलदैवत; पण खंडोबा म्हणजेच मल्हारी, याची कथा जेव्हा लोकगीतातून ऐकायला मिळते, तेव्हा तोही तुम्हा-आम्हा सर्वांप्रमाणेच एक संसारी माणूस होता असं वाटायला लागतं आणि या आपल्या दैवतांबद्दल एक वेगळी आत्मीयता भासायला लागते. खरं तर लोककवयित्रीची एक रचना माझ्या वाचण्यात आली. खंडोबाच्या दोन बायका. एक म्हाळसा आणि दुसरी बाणाई. खंडोबाबरोबर दोघींनी एकत्र नांदण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या आयुष्यात मत्सराचे शिंतोडे उडायचे थांबले नाहीत. सवतीमध्ये जाणवणारा मत्सर तिथेही चुकला नाहीच. ती लोककवयित्री म्हणते, बाणू - म्हाळसाच्या दोघींच्या दोन जाती पालि मल्हारी देवासाठी बसल्या एका ताटी विकासका धनगराची बाणाई. वाण्याची . धनगराची बाणाई, वाण्याची म्हाळसा घास गिळतु तिला कसा? या दोन वेगवेगळ्या जातींतून आलेल्या मल्हारीच्या बायका. एक वाणी समाजाची दुसरी धनगर समाजातील; पण दोघींच्यावर मल्हारीची प्रीती; पण त्यात काही उणे अधिक होतेय, असं दोघींना जाणवायचं. नवरा नवीन आणलेल्या बानूच्या नादाला जास्त लागलाय, असं म्हाळसाला वाटायचं. आपला चांगला सुखात संसार चाललेला असताना ही कोण आपल्या नवऱ्याच्या मागे लागून आली. असं वाटून म्हाळसा चिडायची. बाणाई म्हणजे बानूला ती म्हणायची, HE आईक मी सागते तुला काय लिया चित्त दे माझ्या बोलाला ज र का ग तू भुललिस घेवाला पर जा तू आपुल्या देशाला सीमा झाकल्या पाठीनं जाई म्हणते घे तू ऐकून सात एक्या घडीमधि तोंड बाणाई, टाकिन उतरून शेवटी सवती-सवतीचं भांडण. देवाच्या बायका असल्या म्हणून काय झालं. एकमेकींचा पाणउतारा करायला थोड्याच कचरणार? थोरली असली म्हणून काय झालं. म्हाळसानं असं लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १०९ ॥