पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळकांचे केसरींतील लेख

समुद्रांत टाकण्यास निघाले, तर त्याचे आप्तवर्ग त्यांस इस्पितळाचा मार्ग दाखवतील ! आरंभी सागितलेल्या दत्तकावरील आक्षेपाचा विचारही आम्ही वरील दृष्टीनेंच करणार आहों ; म्हणजे जरी प्रत्येक मनुष्यास आपली इस्टेट हवी त्यास देण्याचा अधिकार असला, तरी मरतेसमयीं दत्तक घेऊन त्यास आपली इस्टेट दिल्यानें त्याच्या पैशाचा दुरूपयोग होतो कीं नाही ? होत असल्यास जरी कायदेशीर अधिकार असला, तरी इतर पुष्कळ दुर्व्यसनांप्रमाणेंच ही चाल टाकाऊ मानली पाहिजे. सारांश धर्मदृष्ट्या व व्यवहारदृष्ट्या, किंवा स्वर्गप्राप्तीसाठी, व नांव चालविण्यासठी दत्तकाची जरूर नाहीं, असें ठरल्यावर त्याच्या ग्राह्याग्राह्यतेचा विचार त्यास इस्टेट दिल्याने काय उपयोग होतो, यावर अवलंबून राहणार. करितां तो उपयोग कितपत होतो ते पाहूं.

      अर्थशास्त्राची किंवा इतिहासाची ज्यास अगदीं साधारण ओळख आहे, त्यास ही गोष्ट माहीत असेल, की अगदीं रानटीं स्थितींत द्रव्याचा संचय कोणीच करीत नसत. संचय केला असता, तो आपल्याजवळ राहून आपणास हवा तेव्हा उपयोगीं पडेल अशी त्या वेळेस कोणाचीही खात्री नव्हती. पुढे जसजशी लोकस्थिति सुधारून गाव, शहरें, देश वगैरे व्यवस्था होऊं लागली, तसतसा प्रत्येक मनुष्याचा स्वकष्टार्जित द्रव्यावरील हक्क लोकानी कबूल केला, व तेव्हापासून संचय करण्याचे इच्छा बळावत चालली. द्रव्यसंचयाचा वरील गोष्टीशी इतका निकट संबंध आहे, की ज्या देशांत मालमिळकतीचे संरक्षण करण्याचे कायदे जरी अमलांत आहेत, तेथें ही इच्छा अगदीं कळसास गेली आहे. आपल्या जन्मापासून आपणास दुस-या सामाजिक स्थितीचा अनुभव नसल्यामुळें, सामाजिक नियमांमुळे आपणांस द्रव्यसंचय करतां येतो ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येत नाही. तथापि  विचाराती ती खरी आहे असे लक्षात आल्याखेरीज राहाणार नाही. चोरी, लबाडी, वगैरे अपराध जर लोकमताने शिक्षेस पात्र नसते, तर हल्लीप्रमाणे द्रव्यसंचय करण्याची कोणी खटपट केली असती कायं? नाही; मग समाजाच्या मदतीखेरीज जर आपणास द्रव्यसंचय करतां आला नसता, तर समाजाचा त्या द्रव्यावर कांहींच हक्क असूं नये काय ? द्रव्यसंचय हें सुखप्राप्तीचें एक साधन आहे. एऱ्हवी त्यास स्वत: काही किंमत नाहीं. हे मनांत आणिले असतां विनाकारण द्रव्यसंचयाचा दुरूपयोग 'परस्परभयाने' बंद करण्याचा हक्क समाजास  नाहीं असें कसें म्हणतां येणार? द्रव्यसंचय करण्यास ज्याअर्थी समाजनियम कारण आहेत, त्याअर्थी कोणीही द्रव्यसंचय केला, तरी त्याचा व्यय चांगल्या कामाकडे करणें, हें त्याचें कर्तव्य आहे. ज्यास आपण जन्म दिला, व ज्यास लहानपणापासून एका विशेष गृहस्थितींत राहण्याची संवय लावून दिली, त्यास मरतेवेळीं आपली इस्टेट देऊन, त्या स्थितीत त्यास राहतां येण्याची सोय करून देणें, हे आपलें कर्तव्य आहे. तथापि आपणांस पुत्र नसता व आपण कोणाचें काहीं लागत नसतां, अगदीं मरतेवेळी आपली सर्व इस्टेट, धर्माची व