पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

सारखे इच्छा आहे; या संबंधाने फारसा मतभेद नाहीं. यासंबंधानें एकी होण्याचा बराच संभव आहे, हें थोड्या दिवसापूर्वी येथें भरलेल्या राष्ट्रीय सभेवरून स्पष्ट दिसून आलें. राजकीय विषयाच्या संबंधानें आमचा एकोपा होऊन आमचें पाऊल लवकर पुढे पडेल असे मानण्यास जीं अनेक कारणें आहेत त्यापैकी मुख्य कारण असें आहे की या कामीं आम्हांस जिंकणा-या आमच्या राज्यकर्त्याकडूनच पुष्कळ साहाय्य होण्याची आशा आहे. इंग्लंडदेश स्वातंत्र्याचे माहेरघर होऊन बसलें असल्यामुळें इंग्लिश लोकाना आपल्या प्रजेस स्वातंत्र्यदानची जशी इच्छा आहे तशी युरोपांतील दुस-या कोणत्याही राष्ट्रास नाही, हे निर्विवाद आहे ! आमच्या देशांतील सुधारकास दोन अवघड किल्ले सर करावयाचे आहेत; एक राजकीय स्वातंत्र्याचा व दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा. दिसण्यांत सध्या दोनही अभेद्य दिसत आहेत. पण सुधारकचमूच्या कुशल अग्रणींनीं सूक्ष्म विचाराच्या दूरदर्शक यंत्रानें ही टेहेळणी केली आहे, तीवरून त्याना असें दिसून आले आहे कीं पहिला हल्ला राजकीय स्वातंत्र्यगडावर केला असता तो विशेष फायदेशीर होणार आहे. कारण या दुर्गाच्या तटावर रक्षणासाठी ठेविलेल्या शिपायात सुधारकाना अनुकून अशी काहीं मित्रमंडळी आहे. या घरभेद्या मंडळीच्या साह्याने आमचें थोडक्या वर्षांत बरेच हित होण्याची आशा आहे ! आम्ही निकराची चाल केली असता त्याच्याकडून योग्य प्रसंगी तटाचे दरवाजे उघडले जाऊन ते आम्हास आत घेतील असें मानण्यास बराच आधार आहे. या राजकीय दुर्गाच्या उलट असलेल्या दुर्गाच्या संबंधाने अशा प्रकारची आतूना मदत होण्याची मुळीच आशा नाहीं. या दुर्गाच्या कोटात आम्हास अनुकूल असा एकही इसम नाहीं; त्यामुळें तो सर करण्यास आम्हांस बरींच वर्षे खटपट केली पाहिजे. पांच पन्नास वर्षे त्याला वेढा घालून जेव्हां बसावें, व आत अन्नपाणी जाण्याच्या सा-या वाटा मजबूद रीतीनें अडवाव्या, व आंतील वीरास भुकेने व तान्हेने जेरीस आणावे, तेव्हा कोठें त्याच्याकडून तहाचे निशाण लागलें तर लागेल. तसें होईपर्यंत आमची सर्व धामधूम फुकट जाणार आहे. पहिला किल्ला घेंणं सुसाध्य आहे; दुसरा घेणें असाध्य तर नाहींच पण कष्टसाध्य किंवा दु:साध्य आहे. पहिला सर करण्यांत केलेले श्रम फारसे व्यर्थ जाण्याचा संभव नाही; दुसरा घेण्यासाठी केलेल्या श्रामाचें फळ लवकर येण्याची आशा नाही. पहिल्यावर स्वारी करण्याविषयी सा-याना सारखी उत्सुकता आहे; दुसर्याच्या तटावर गोळ्या सोडण्यास सा-याचा हात सारखा वहात नाहीं. शिवाय जर सुदैवानें सुधारकसेनेस पहिला घेता आला तर त्याच्या उंच तटावर उभें राहून दुसरा सर करण्यास तिला बिलकुल श्रम पडणार नाहींत. कारण कोणत्याही कारणासाठीं मनुष्यांना एकदा एकदिलाने वागण्याची, श्रम सोसण्याची, दुस-यासाठीं स्वहिताचा त्याग करण्याची, व स्वातंत्र्य आणि मोठेपणा संपादण्याची चटक लागली म्हणजे ती चटक त्यांना प्रथम जीं कामे अशक्यशीं वाटलेलीं