पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/100

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्रीशिक्षणाची दिशा. く"A त्यांच्या हातून पुरुषांस व्हावें तसें साहाय्य होणार नाहीं. अशी माहिती त्यांस असणें जरूर आहे; पण पुरुषांच्या धद्यांत पडणे त्यास इष्ट नाहीं. रोजगार, धंदा, व्यवसाय वगैरे पुरुपाचे भाग आहेत, आणि संगोपन, आस्था, दया, आनकूल्य वगैरे स्त्रियांचे होत. प्रत्येकानें आपापला कार्यभाग चागला करण्यास झटार्वे यांतच त्यास भूषण आहे, व हेंच त्यांचे कर्तव्य आहे. यासाठी दोहॉस जे शिक्षण द्यावयाचें तें त्या त्या वर्गाच्या कर्तव्याकडे लक्ष देऊनच दिले पाहिजे. वैद्यकीचा किंवा वकिलाचा धेदा करू इच्छिणाच्या स्त्रियाची संख्या फारच कमी आहे, व ती अशीच राहील. बाकी बहुतेक स्रिया २०।२१ वे वर्षी विवाहित होतात व तेव्हापासून त्यास गृहकृत्याकडे स्वभावत:च नजर पाँचवावी लागते. या मोठ्या वर्गास आपले कर्तव्य ज्या त-हेचे चागलें बजावता येईल असाच शिक्षणक्रम स्त्रियांच्या शाळात ठेविला पाहिजे. हें एक प्रकारचे धेदेशिक्षणच आहे. ज्याप्रमाणें मुलास, तो नावा डयाचा, शिपायाचा वगैरे धंदा करण्यास योग्य होईल, असें शिक्षण मुलाच्या शाळात मिळत, त्याचप्रमाणें स्त्रियाच्याही शाळाची गोष्ट आहे. हा भद मनात आणता जेो शिक्षणक्रम अमलात येईल तो कधीही शाश्वत होणार नाहीं. सदर निबंधात दुस-याही आणखी काहीं गोष्टी आहेत. पण त्याचा संबंध इंग्लंडच्या प्रस्तुत स्थितीशीच असल्यामुळे त्या येथे देत नाहीं, स्त्रीशिक्षणाचा मुख्य उद्देश काय याबद्दल जरी मतैक्य असले, तरी ज्या देशात स्त्रियाचे विवाह प्रौढपणीं होतात तेथील स्त्रीशिक्षणक्रमात व आमच्याकडील स्रीशिक्षणक्रमात थोडाबहुत फेर पडलाच पाहिजे. यासाठी इंग्लंडातील शिक्षणक्रम प्रथम स्रीशिक्षणाच्या वरील उद्देशास अनुकूल असला तरीही तो आपणांस जशाचा तसाच घेता येणार नाही हें उघड आहे. तथापि स्त्रीशिक्षणाच्या उद्देशासंबंधाने मतभेद असण्याचे काहीं कारण नाहीं स्रियाची योजना स्वभावत:च घरातील कृत्यें करण्याकडे झालली आहे व तीस अनुकूल असेच शिक्षण त्यांस मिळाले पाहिजे हेंच काय ते मुख्य तत्त्व आहे. आपल्याकडील स्त्रियाचा विवाहकाल वाढून प्रौढविवाह कधी प्रचारात येतील ते येवेोत. तोपर्यंत आमची साप्रतची स्थिति लक्षात आणूनच आम्हास वर्तन केले पाहिजे. मुलींच्या आहेत त्या शाळा सुधारून व्यवस्था नीट केल्यास १०॥११ वर्षापर्यंत म्हणजे साधारणरीत्या विवाहापूर्वी मुलीस लेखनवाचन साधारण नीट शिकवितां येईल. आता पुढील शिक्षणाची तजवीज करावयाची ती मुलगी सासरी गेल्यावर घरचे थेोडेंबहुत काम सभाळून राहिल्या वेळात तिला उपयुक्त विषयाची माहिती मिळेल अशा रीतीने केली पाहिजे. मुलाप्रमाणे सात केवा आठ यात्रा करून अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत त्याच्याकडून घोकंपट्टी करवून शिवाय राहिल्या वेळात त्यानी शाळेतील धडे करावे हैं त्याच्या पुढील कर्तव्यास अगदीं विरुद्ध आहे. नाइंटॉन्थ सेंचुरीमधील वर सांगितलेल्या निबंधांत लिहिल्याप्रमाणें काहीं थोडया स्त्रियास हा अम्यासक्रम इष्ट असेल. पण